शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

मालमत्ताकर थकबाकीदारांवर होणार कडक कारवाई, थकबाकीदारांची यादी तयार

By नामदेव मोरे | Updated: September 26, 2023 15:47 IST

मालमत्ता कर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. यामधून प्राप्त होणाऱ्या महसूलातूनच महानगरपालिका क्षेत्रातील नागरी सेवासुविधा दर्जेदारपणे पुरविणे शक्य होते.

नवी मुंबई: मालमत्ताकर वसूलीचे ८०० कोटीचे उद्दीष्ट साद्य करण्यासाठी महानगर पालिकेने कंबर कसली आहे. सर्व थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून सर्वाधिक थकबाकी असणारांपासून कारवाई  केली जाणार आहे.

मालमत्ता कर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. यामधून प्राप्त होणाऱ्या महसूलातूनच महानगरपालिका क्षेत्रातील नागरी सेवासुविधा दर्जेदारपणे पुरविणे शक्य होते. त्यामुळे नमुंमपा आयुक्त  राजेश नार्वेकर यांचे मालमत्ताकर वसूली कार्यवाहीकडे बारकाईने लक्ष आहे.या अनुषंगाने मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख तथा अतिरिक्त‍ आयुक्त‍  सुजाता ढोले यांनी मालमत्ताकर विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांची विशेष बैठक घेतली. वसूलीचा विभागनिहाय लक्ष्यांक देत गतीमान कार्यवाहीचे निर्देश दिले.  जे कर्मचारी कामात हलगर्जीपणा करताना आढळतील त्यांच्यावर  प्रशासकीय कारवाई करण्याचेही स्पष्ट संकेत यावेळी देण्यात आले.दर आठवडयाला कर्मचा-यांनी केलेल्या कामाचा  आढावा घेतला जाणार आहे. शहर विकासात मालमत्ताकराचे महत्व लक्षात घेऊन प्रत्येकाने टारगेट नजरेसमोर ठेवून काम करा अशा स्पष्ट सूचना दिल्या. कामात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा चालणार नाही असेही त्यांनी निर्देशित केले.

आर्थिक वर्षात अर्थसंकल्प सादर करताना आयुक्तांनी मालमत्ताकर विभागास 800 कोटी रक्कमेचे उद्दिष्ट दिलेले आहे. त्यानुसार मालमत्ताकर विभाग वर्तमान वर्षातील करवसूलीप्रमाणेच थकबाकीदार मालमत्ताकर धारकांकडून थकीत मालमत्ताकर वसूली करण्याकडेही विशेष लक्ष देत आहे. या अनुषंगाने मोठया रक्कमेची थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांपासून उलटया क्रमाने थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात मोठ्या रक्कमेच्या थकबाकीदारांकडील वसूलीला प्राधान्य देण्यात येत आहे. १५ सप्टेंबर पर्यंत २३५ कोटी रक्कमेची मालमत्ताकर वसूली करण्यात आलेली आहे. यामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने थकबाकी वसूलीकडे प्राधान्याने लक्ष दिले जात असून त्यासोबतच नवीन मालमत्ता ह्या मालमत्ताकराच्या कक्षेत आणण्यावर भर दिला जात आहे.  

अधिकारी कर्मचा-यांना थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट 

अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले यांनी थकबाकीदारांच्या विभागनिहाय याद्यांचा आढावा घेत संबंधित कर्मचारी यांनी दोन दिवस कार्यालयीन कामकाज, दोन दिवस थकबाकी वसूलीचे काम व एक दिवस जप्तीविषयक काम अशी साप्ताहिक कार्यप्रणाली ठरवून घेऊन व तशाप्रकारे आपल्याकडील कामाचे नियोजन करुन थकबाकी वसूलीवर गांभीर्यपूर्वक लक्ष दयावे असे आदेशित केले. यामध्ये निवासी क्षेत्राप्रमाणेच एमआयडीसी भागातील थकबाकी वसूलीवरही लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक विभागाला मालमत्ताकर वसूलीचे उद्दिष्ट निश्चित करुन देत त्याच्या पूर्ततेसाठी संपूर्ण क्षमतेने काम करा व नागरिकांशी सतत संवादी राहून समन्वय राखत पाठपुरावा करा असेही सूचित करण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई