शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाबत निष्काळजी करणाऱ्यांवर कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:40 IST

पालिका आयुक्तांचा इशारा :नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन

 लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनाची दुसरी लाट अधिक हानिकारक असेल याचे भान ठेवून महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढविली जात आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. 

नागरिकांनीही नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त अभिजित बांगर यांनी केले असून, जे निष्काळजीपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महानगरपालिकेने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी, नाेडल अधिकारी, उपायुक्त, विभाग अधिकारी यांची विशेष बैठक घेतली. या बैठकीमध्ये ‘मिशन - ब्रेक द चेन’ काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्ण वेळेत शोधण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. शहरातील २३ केंद्रे, एपीएमसी व एमआयडीसीमधील विशेष केंद्रे अधिक कृतिशील करण्याच्या सूचना केल्या आहेत. फेरीवाले, दुकानदार, रिक्षाचालक, सार्वजनिक वाहनांचे चालक अशा मोठ्या प्रमाणात लोकसंपर्कात येणाऱ्यांची प्राधान्याचे तपासणी केली जाणार आहे. रुग्णांच्या संपर्कातील २४ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचीही तपासणी केली जात असून, त्यामध्ये सातत्य ठेवले जाणार आहे.

महानगरपालिकेने रुग्णालय यंत्रणा सक्षम केली आहे. पुरेसा औषधसाठाही उपलब्ध केला आहे. ज्या सेंटरमधील प्रवेश थांबिवले आहेत, ती रुग्णालयेही पुन्हा तत्काळ सुरू करता येतील अशी तयारी केली आहे. कन्टेनमेंट झोनचे प्रभावी व काटेकोरपणे व्यवस्थापन केले जात आहे. कोरोनाची दुसरी लाट जास्त हानिकारक असेल हे गृहीत धरून मास्कचा नियमित वापर करण्यात यावा, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांसह नियुक्त केलेल्या दक्षता पथकांनी कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.

रेल्वे स्टेशन परिसरातही चाचणी केंद्रनवी मुंबई महानगरपालिकेने चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. २३ केंद्रे, एपीएमसी व एमआयडीसीमधील विशेष केंद्रांबरोबर आता रेल्वे स्टेशन परिसरात ॲन्टिजन चाचणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना तत्काळ चाचणी करता यावी यासाठी हा निर्णय घेतला आहे.

मिशन ब्रेक द चेन - २महानगरपालिकेने जुलैमध्ये मिशन ब्रेक द चेन अभियान सुरू केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवली. आरटीपीसीआर व ॲन्टिजेन चाचण्यांची सुविधा उपलब्ध केली होती. आता महानगरपालिकेने ‘मिशन ब्रेक द चेन - २’ अभियान हाती घेतले असून, शहरवासीयांनी नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या