शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

पाणीपुरवठा यंत्रणेला बळकटी

By admin | Updated: December 21, 2015 01:33 IST

पनवेल शहरातील २०४५ सालच्या लोकसंख्येचा विचार करून शहर पाणीपुरवठा योजना सक्षम करण्यात येणार आहे. त्याकरिता एकूण १५३ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

प्रशांत शेडगे, पनवेलपनवेल शहरातील २०४५ सालच्या लोकसंख्येचा विचार करून शहर पाणीपुरवठा योजना सक्षम करण्यात येणार आहे. त्याकरिता एकूण १५३ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची सरकारच्या तांत्रिक व्यवस्थापनाकडून छाननी होवून मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव अमृत योजनेंतर्गत सरकारकडे सादर करण्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल असा आशावाद पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.देहरंग धरणाची क्षमता कमी असल्याने पालिका एमजेपी, एमआयडीसी आणि सिडकोकडून पाणी विकत घेऊन ते पनवेलकरांना पुरवते. प्रशासनाला दरमहा देहरंग धरणाचे पाणी सोडून ५० लाख रुपये खर्च येतो. मात्र पाणी बिलापोटी फक्त ४० लाख रुपयेच जमा होतात. याचा अर्थ दरमहा १० लाखांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागत असून सुमारे दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त पाण्यासाठी वर्षाला अदा करावे लागतात. त्यांचा परिणाम विकासकामावर होत असून पाण्याने अनेकदा पालिकेला कर्जबाजारी केले आहे. पनवेल शहराला वर्षभर पाणीपुरवठा करण्याकरिता मुबलक पाण्याची उपलब्धता असण्याबाबत चर्चा झाल्या. त्यातून शहर पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्याचा मुद्दा पुढे आला. धरणाची उंची वाढविण्याकरिता सर्व्हे करण्यात आला. संबंधित कंपनीने अहवाल तयार करून पालिकेला सादर केला आहे. त्यानुसार उंची वाढविण्याचा प्रस्ताव आहेच. त्याचबरोबर चार महिने पावसाळयात ओव्हरफ्लो होणारे पाणी उपयोगात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.त्याचबरोबर ३८ एमएलडी क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. धरणाच्या खालच्या बाजूला हे के ंद्र उभारण्याचे नियोजन असल्याचे आराखड्यात म्हटले आहे. आवश्यक तिथे वितरण व्यवस्था व लोकसंख्येच्या प्रमाणानुसार एकूण सहा उंच जलकुंभ शहरात प्रस्तावित आहेत. शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणा पंपिंग मशिनमुळे सक्षम होईल त्याचबरोबर नागरिकांना जास्त दाबाने पाणीपुरवठा करता येणार आहे. याकरिता एकूण ११० कोटींचे विस्तृत अंदाजपत्रक व आराखडे सरकारकडे सादर करण्यात आले आहेत.देहरंग धरणातील इनटेक वेल बांधणे जेणेकरून पाण्याचा साठा वाढेल, ३८ एमएलडी क्षमतेची जलशुध्दीकरण केंद्र विकसित करणे या गोष्टींचा समावेश आहेच. त्याचबरोबर साडेबारा एमएलडी क्षमतेची गाढेश्वर मंदिराजवळ बैठी टाकी बांधण्याचा प्रस्ताव आहे. ६00 मि.मी. व्यासाची १३ कि.मी. लांबीची गुरुत्व जलवाहिनी टाकणे, पाच आरसीसी उंच जलकुंभ उभारणे त्याची क्षमता प्रत्येकी १ एमएलडी असेल. शहरातील सर्व ग्राहकांना अद्ययावत मीटर बसविणे. शहरात आवश्यक तिथे जलवाहिन्या टाकण्याबरोबर पंपिंग मशिनरी बसविण्याचा प्रस्ताव आराखड्यात आहे.योजनेमुळे पनवेल शहराचा पाणीप्रश्न निकाली निघेल याबाबत शंका बाळगण्याचे काही एक कारण नाही. त्या दृष्टीने आमचा पाठपुरावा सुरू आहे. धरणाची उंची वाढविण्याकरिता ७० कोटी खर्च अपेक्षित असून एकूण १५३ कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर केले आहे. जसा निधी प्राप्त होईल त्याप्रमाणे कामांना सुरुवात करण्यात येईल.- मंगेश चितळे, मुख्याधिकारी, पनवेल नगरपालिका.