शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

कहाणी ‘अंतरंग’ म्युझियमच्या अस्तित्वाची!

By admin | Updated: May 18, 2015 05:12 IST

लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. शालेय वयातच लैंगिक शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांना माहिती

मुंबई : लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. शालेय वयातच लैंगिक शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिल्यास त्याविषयीचे गैरसमज दूर होऊन समाज अधिक सजग होईल. मात्र लैंगिक शिक्षणाचे धडे देणारे ‘अंतरंग’ म्युझियम बंद झाल्याने आजही लैंगिक शिक्षणापासून समाजाला वंचित राहावे लागत आहे.कामाठीपुरा भागात मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था आणि महापालिकेच्या आरोग्य केंद्राच्या पुढाकाराने २००२ मध्ये ‘अंतरंग’ हे सेक्स म्युझियम सुरू केले होते. शालेय विद्यार्थी, तरुण पिढीमध्ये एड्सबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हे म्युझियम सुरू करण्यात आले होते. या म्युझियममध्ये वेगवेगळ््या माध्यमांतून एड्सविषयक माहिती देण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव ही इमारतच काही वर्षांपूर्वी तोडण्यात आल्याने येथील कलादालनही बंद झाले.या म्युझियममध्ये ‘कामशास्त्र’ ग्रंथाच्या पहिल्या पानापासून सर्व संदर्भांची माहिती देण्यात आली होती. तसेच त्यानंतर ऊर्जेचा स्त्रोत मानले गेलेले शिवलिंग, त्याच्याशी जोडलेल्या आख्यायिका, मातृसत्ताक पद्धती असलेल्या काळापासून ते आजच्या आधुनिक समाजाचे वारली चित्रकलेच्या माध्यमातून रेखाटलेले चित्र हे सारे सर्वप्रथम लक्ष वेधून घ्यायचे. संग्रहालयात स्त्री-पुरुषाच्या शरीराची तपशीलवार माहिती मांडण्यात आली होती. शिवाय लैंगिकतेच्या मानसिकतेशी असलेल्या संबंधांवरही प्रकाश टाकला जायचा. या म्युझियमचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केवळ शारीरिक आकर्षणातून आलेल्या संबंधाच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणारी पंख असलेली नग्नावस्थेतली तरुण स्त्री-पुरुषाची जोडी लक्ष वेधून घेत असे. पण म्युझियम बंद झाल्याने हे शिक्षणच थबकले आहे. (प्रतिनिधी)