शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

१९ आॅगस्टला काँग्रेसचे रास्ता रोको

By admin | Updated: August 17, 2016 03:11 IST

गेल्या काही वर्षांत कित्येक प्रवाशांचे अपघातात बळी घेणाऱ्या मुंबई - गोवा, महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवावेत तसेच येत्या दीड वर्षात या महामार्गाचे

महाड : गेल्या काही वर्षांत कित्येक प्रवाशांचे अपघातात बळी घेणाऱ्या मुंबई - गोवा, महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवावेत तसेच येत्या दीड वर्षात या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण करावे या प्रमुख मागणीसाठी महाडमध्ये काँग्रेस पक्षातर्फे १९ आॅगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार माणिक जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिला. या महामाार्गच्या रुंदीकरणात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत. त्या शेतकऱ्यांची शासन दिशाभूल करीत असल्याचा आरोपदेखील जगताप यांनी केली. महामार्गावर कोसळलेल्या सावित्री पुलाशेजारीच त्याला समांतर असलेल्या पूल हा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला, त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी होते. सावित्री पूल दुर्घटनेला शासनच जबाबदार असल्याचा आरोपही जगताप यांनी केला. अद्यापही महामार्गाच्या चौपदरीकराच्या भुसंपादनाबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत. शहर भागात रेडीरेकनरच्या दुप्पट तर ग्रामिण भागात चौपट भरपाई देण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे. मात्र केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ४० लाख रु. हेक्टरी भरपाई देण्यात येणार असल्याची घोषणा केली. नुकसान भरपाईची हि पध्दत फसवी असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले. या रास्तारोको आंदोलनात हे प्रकल्पग्रस्त शेतकरी देखील सहभागी होणार असून हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष कृष्णा शिंदे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)