शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरांवरील कारवाई थांबवा

By admin | Updated: February 16, 2017 02:21 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडको, एमआयडीसी व महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली आहे.

नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडको, एमआयडीसी व महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली आहे. वारकरी संप्रदायाने या कारवाईबद्दल खेद प्रकट केला आहे. शहरातील मंदिरांवर सुरू असलेली ही कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना साकडे घातले आहे. सुनियोजित नवी मुंबई शहरात बेकायदा धार्मिक स्थळांचे पेव फुटले आहे. आपापल्या कार्यक्षेत्रात २00९ नंतर उभारलेल्या बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने संबंधित प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महापालिका, सिडको आणि एमआयडीसीने बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत आतापर्यंत अनेक धार्मिक स्थळे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील वारकरी संप्रदाय दुखावला गेला आहे. मंदिरांवरील ही कारवाई थांबवावी, अटी व शर्तीचे बंधन घालून ही मंदिरे नियमित करावीत, अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वारकरी संप्रदायाच्या एका शिष्टमंडळाने बुधवारी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेतली. त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. ही कारवाई थांबविण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करण्याची गळ घातली.दरम्यान, धार्मिक स्थळांवरील कारवाई थांबविण्यासाठी आपला शासकीय स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांचीशीही आपण यासंदर्भात चर्चा केली आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांवरील कारवाई नक्कीच थांबविली जाईल, असे आश्वासन आमदार म्हात्रे यांनी या शिष्टमंडळाला दिले.या शिष्टमंडळात श्री नागाई सामाजिक सेवा ट्रस्ट, संत जगद्गुरू तुकाराम महाराज वारकरी मंडळ, संत ज्ञानेश्वर माउली वारकरी मंडळ, विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ, हिंदू जनजागृती समिती व शिव प्रतिष्ठान आदींच्या प्रतिनिधींचा समावेश होता. (प्रतिनिधी)