शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

आरटीओनेच केले रिक्षाचालकांचे ‘स्टिंग’; भाडे नाकारणाऱ्या २५ चालकांविरोधात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 05:34 IST

शहरात रिक्षा भाडे नाकारणा-या रिक्षाचालकांविरोधात तक्रारी वाढू लागल्या आहेत. यामुळे पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी गुरुवारी स्टिंग आॅपरेशन करून २५ रिक्षाचालकांवर कारवाई केली.

- वैभव गायकरपनवेल : शहरात रिक्षा भाडे नाकारणाºया रिक्षाचालकांविरोधात तक्रारी वाढू लागल्या आहेत. यामुळे पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी गुरुवारी स्टिंग आॅपरेशन करून २५ रिक्षाचालकांवर कारवाई केली. खांदेश्वर, पनवेल रेल्वेस्थानक, खारघर, मानसरोवर याठिकाणी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने एकूण सहा टीम तयार करून हे स्टिंग आॅपरेशन केले.प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी रिक्षा भाडे नाकारणाºया तक्रारींची खात्री करण्यासाठी सहा पथके तयार केली होती. स्वत:ही एका पथकामध्ये सहभागी झाल्या. चार ठिकाणी प्रादेशिक परिवहन अधिकारी व विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना रिक्षाचालकांकडून थक्क करणारे अनुभव आले. भाडे नाकारणे, गणवेश परिधान न करणे, वाहनाचा परमिट डिस्प्ले न करणे, रिक्षा मीटरप्रमाणे न चालवणे, जास्त भाडे आकारणे अशा स्वरूपात रिक्षाचालकांकडून आरटीओ अधिकाºयांना नवीन अनुभव आले. दैनंदिन जीवनात सर्वसामान्य या अनुभवांना नेहमीच सामोरे जात असतात. तशाप्रकारे तक्र ारी देखील आरटीओ अधिकाºयांना प्राप्त होत असतात. मात्र या तक्र ारींची शहानिशा करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील व त्यांच्या टीमने ग्राहक बनून पनवेल व उपनगरातील रिक्षाचालकांची झाडाझडती घेतली. या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचा खुद्द आरटीओ अधिकाºयांना अनुभव आला. या कारवाईत सुमारे २५ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकंदरीत सुमारे २५ हजारांचा दंड देखील वसूल करण्यात आला. या स्वरूपाच्या नियमांचे उल्लंघन पुन्हा केल्यास या रिक्षाचालकांना आपल्या परमिटपासून मुकावे लागणार असल्याचा इशारा हेमांगिनी पाटील यांनी दिला आहे. या स्टिंग आॅपरेशनकरिता तयार करण्यात आलेल्या पथकात लक्ष्मण बरगे, ज्योती तिवरे, शिल्पा जंगले, अरिफ शेख, शांताराम साठे, किरण पाटील, कालिदास झजाणे, रूपाली राऊत, स्मिता भोसले, दीपाली कटके, नितीन पवार, राहुल गावडेसह अधिकारी व कर्मचाºयांचा सहभाग होता.परिवहन अधिकाºयांना मीटरप्रमाणे भाडे नाकारलेमीटरप्रमाणे रिक्षा चालवणे बंधनकारक असतानाही पनवेलच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांना खारघर येथील मीटरप्रमाणे रिक्षा चालवण्यास रिक्षाचालकाने नकार दिला. साध्या वेशात हेमांगिनी पाटील यांनी खारघर रेल्वे स्थानकातून एमजीएम रु ग्णालय कामोठे या ठिकाणी रिक्षाचालकाला सोडण्यास सांगितले. या वेळी रिक्षाचालकाने मीटरप्रमाणे भाडे नाकारून १५० रु पये भाडे होईल, असे पाटील यांना सांगितले.आग्रह करूनदेखील रिक्षाचालकाने मीटरप्रमाणे रिक्षा न चालवता १३० रुपये अंतिम भाडे होईल, असे हेमांगिनी पाटील यांना सांगितले. या वेळी आपल्या रिक्षामध्ये बसलेल्या महिला या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असल्याचे रिक्षाचालकाला शेवटपर्यंत कळालेच नाही. या वेळी अर्धवट प्रवास पूर्ण झाल्यानंतर रिक्षाचालकाला स्वत:ची ओळख करून दिल्यानंतर रिक्षाचालकाची चांगलीच भंबेरी उडाली.वरिष्ठ अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ग्राहकांच्या या संदर्भात अनेक तक्र ारी येत असतात. मीटरप्रमाणे भाडे चालवणे बंधनकारक असतानादेखील रिक्षाचालक ग्राहकांचे ऐकत नसल्याने आम्ही साध्या वेशात रिक्षात ग्राहक बनून हा अनुभव घेतला, अशाप्रकारे कारवाई सुरूच राहणार आहे. रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे.- हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल

टॅग्स :panvelपनवेल