शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांच्या पाठोपाठ  मांजरांचे निर्बिजीकरण; पनवेल महानगरपालिकेच्या भटक्या  मांजराचे लसीकरण व  निर्बिजीकरण केंद्राचे उद्घाटन

By वैभव गायकर | Updated: June 23, 2023 18:31 IST

कुत्र्यांचे निर्बिजीकरण आपण ऐकतो मात्र मांजरांचे देखील निर्बिजीकरण आणि लसीकरण केंद्र पनवेल महानगरपालिकेने सुरु केले आहे.

पनवेल : कुत्र्यांचे निर्बिजीकरण आपण ऐकतो मात्र मांजरांचे देखील निर्बिजीकरण आणि लसीकरण केंद्र पनवेल महानगरपालिकेने सुरु केले आहे. पनवेल शहरातील हे केंद्र पोदी येथे  श्वान नियंत्रण केंद्राच्या वरील मजल्यावरती सुरु करण्यात आले असुन आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय अधिकारी  डॉ. आनंद गोसावी, पशुधन वैद्यकिय अधिकारी डॉ. भगवान गीते, मुख्य सर्जन डॉ. हनुमान घनवट , प्रभाग अधिकारी रोशन माळी ,आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, अरूण कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.भटक्या मांजराच्या संख्येवर नियंत्रण आणणेकरिता भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात जसा नसबंदी कार्यक्रम राबविण्यात येतो, त्याच धर्तीवर भटक्या माजंरासाठी  नसबंदी कायदा राबविण्याच्या ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया यांच्या सूचना महापालिकेस प्राप्त झाल्या होत्या, त्याप्रमाणे इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स ,इंडिया  संस्थेच्या माध्यमातून महापालिकेने भटक्या मांजराचे लसीकरण व निर्बिजीकरण केंद्र सरू केले आहे.या केंद्रामध्ये पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यावरील भटक्या मांजरी तसेच भटक्या मांजरींचे लसीकरण व निर्बिजीकरण करण्यात येत आहे.  

वर्षाला सरासरी 300 मांजरींचे लसीकरण व निर्बिजीकरण व 200 आजरी मांजरींवर औषधोपचार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या या केंद्रावरती  दर मंगळवार, गुरूवार, शनिवार मांजरीचे 9 ते 5 यावेळेत लसीकरण व निर्बिजीकरण करण्यात येणार आहे.महापालिकेकडे  या केंद्राकडे चार रूग्णवाहिका असून महापालिकेतील  या वाहिकेच्यामाध्यमातून भटके कुत्रे व भटके मांजर पकडण्यात येणार आहे.पनवेल महानगरपालिकेत एक हजार मोकाट मांजरी असल्याचा अंदाज पालिकेने बांधला आहे.

राज्यातील दुसरी महानगरपालिका -कुत्र्यांच्या पाठोपाठ मांजरांचे निर्बिजीकरण तसेच लसीकरण करणारी यंत्रणा मुंबई महानगरपालिकेने सुरु केली आहे.त्या पाठोपाठ पनवेल महानगरपालिकेचा क्रमांक लागत आहे.राज्यात केवळ दोनच महानगरपालिककेत हे केंद्र सुरु आहेत.

टॅग्स :panvelपनवेल