शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मानकु लेत शेतीला उधाणाचा फटका

By admin | Updated: November 17, 2016 06:01 IST

समुद्राच्या उधाणाचा फटका अलिबाग तालुक्यातील मानकुले येथील शेतीला बसला आहे.

अलिबाग : समुद्राच्या उधाणाचा फटका अलिबाग तालुक्यातील मानकुले येथील शेतीला बसला आहे. समुद्राचे खारेपाणी शेतामध्ये घुसून तेथील शेतक ऱ्यांचे नुकसान झाले आहे. तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी खारभूमी सर्वेक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.मानकुले परिसरात सातत्याने समुद्राच्या उधाणाचे पाणी घुसतच असते. खारे पाणी शेतामध्ये घुसून आतापर्यंत हजारो हेक्टर शेतीचे क्षेत्र नष्ट झाले आहे. शेतीमध्ये खारे पाणी घुसल्याने तेथे मोठ्या प्रमाणात खारफुटी वनस्पतींचे जंगल निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन तर घेता येतच नाही, शिवाय तेथील शेतकरी शेतीही विकू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तेथील शेतकरी चांगलेच हवालदिल झाले आहेत. सरकारने याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये समुद्राला मोठ्या प्रमाणात उधाण आले होते. तेथे असणारी खारबंदिस्ती तुटली. उधाणामुळे समुद्राचे खारे पाणी शेतामध्ये घुसले. यामुळे शेतक ऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.खारभूमी विभागाकडून २००६-०७ पासून या विभागात खारबंदिस्तीचे काम झालेले नाही; परंतु माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये या ठिकाणी २०१३-१४ आणि २०१६-१७ या कालावधीमध्ये सुमारे पाच लाख ९३ हजार ६०६ रु पये खर्च करण्यात आले आहेत. एकही रु पया खर्च झालेला नसताना लाखोंची कामे कुठे झाली या कामांची चौकशीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनावर चंद्रकांत पाटील, गजाजन पाटील, नवनाथ पाटील, महादेव पाटील, बलदेव पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. शेतीच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. नुकसानभरपाई सरकारच्या तिजोरीतून नको, तर खारभूमीचे कनिष्ठ अभियंता यांच्या पगारातून द्यावी, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खारभूमीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, असे म्हटले आहे. (प्रतिनिधी)कामाच्या चौकशीची मागणी : खारभूमी विभागाकडून २००६-०७ पासून या विभागात खारबंदिस्तीचे काम झालेले नाही; परंतु माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये या ठिकाणी २०१३-१४ आणि २०१६-१७ या कालावधीमध्ये सुमारे पाच लाख ९३ हजार ६०६ रु पये खर्च करण्यात आले आहेत. एकही रु पया खर्च झालेला नसताना लाखो रु पयांची कामे कुठे झाली या कामांची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनावर चंद्रकांत पाटील, गजाजन पाटील, नवनाथ पाटील, महादेव पाटील, बलदेव पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.