नवी मुंबई : कोपरखैरणे येथून तीन वर्षांच्या मुलाच्या अपहरणाची घटना शुक्रवारी दुपारी घडली होती. अपहरणानंतर मुलाच्या कानातले कुंडल चोरून त्याला गार्डनमध्ये सोडून देण्यात आले होते. यासंबंधीची तक्रार दाखल होताच पोलिसांनी मुलाचा शोध घेऊन त्याचे कुंडल चोरणाऱ्यालाही परिसरातून अटक केली.शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास सेक्टर ५ येथे हा प्रकार घडला. तिथे राहणारया अनुष्का जोगदंडकर यांचा तिन वर्षाचा मुलगा रेवांश हा घराबाहेर खेळत होता. यावेळी त्याच्या आईची नजर चुकवून अज्ञाताने रेवांशचे अपहरण केले. रेवांशचे अपहरण झाल्याचे काही वेळाने आई अनुष्का यांच्या निदर्शनास येताच त्यांनी परिसरात त्याचा शोध घेतला. अखेर त्यांनी रेवांशच्या अपहरणाची तक्रार कोपर खैरणे पोलीसांकडे केलेली. यावेळी क्षणाचाही विलंब न लावता वरिष्ठ निरिक्षक सतिष गायकवाड यांनी, सहाय्यक निरिक्षक विक्रम बनसोडे, उपनिरिक्षक योगेश देशमुख यांचे पथक रेवांशच्या शोधकामी लावले. या पथकाकडून शोध सुरु असतानाच तो सेक्टर ५ ते ८ मधील उद्यानात आढळून आला. अनुष्का यांनी रेवांशची विचारपुस केली असता त्याने उद्यानातच उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे हात दाखवला. तसेच स्वतच्या कानाला हात लावून कुंडल चोरीला गेल्याचेही त्याने सांगितले. परंतु अनुष्का यांनी आरडा ओरडा केल्याने चोरट्याने तिथून पळ काढला. त्याच्या शोधात पोलीसांनी संपुर्ण परिसरात गस्त घातली होती. अखेर सेक्टर ५ येथील रस्त्यालगत तो उभा असताना पोलीसांनी त्याला पकडले. संतोष राठोड (३०) असे त्याचे नाव असून तो बिगारी कामगार आहे. रेवांश राहत असलेल्या परिसरातच तो राहणारा आहे. घरासमोर एकटा खेळणारया रेवांशच्या कानातले सोण्याचे कुंडल पाहून त्याने त्याला पळवले होते. चौकशी त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे वरिष्ठ निरिक्षक सतिष गायकवाड यांनी सांगितले. तसेच त्याने चोरलले पाच हजार रुपये किमतीचे कुंडलही त्याच्याकडून जप्त केले आहे. गुन्ह्याची तक्रार येताच पोलीसांनी तात्काळ कार्यवाही केल्यामुळे हा चोरटा पोलीसांच्या हाती लागला आहे. (प्रतिनिधी)
मुलाचे अपहरण करून दागिने चोरी
By admin | Updated: September 5, 2015 03:11 IST