शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

By admin | Updated: April 29, 2017 01:57 IST

महापालिका निवडणुकीसाठी २९ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी मनपा क्षेत्रांमध्ये

पनवेल : महापालिका निवडणुकीसाठी २९ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी मनपा क्षेत्रांमध्ये सहा ठिकाणी अर्ज भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी पोलीस, पालिका व निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली आहे. उमेदवारी अर्ज भरताना गोंधळ होऊ नये यासाठी केंद्रामध्ये उमेदवारासह जास्तीत जास्त पाच जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे. पनवेल महानगरपालिकेच्या २० प्रभागात ७८ जागांसाठी निवडणुका होत आहेत. याकरिता राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत सहा निवडणूक निर्णय अधिकारी नेमले आहेत. प्रभाग क्र मांक १, २, ३ साठी डी. एन. भनकवाड (उपविभागीय अधिकारी, कर्जत) हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत असणार आहेत. नावडे येथील परशुराम जोमा म्हात्रे व आत्माराम धोंडू म्हात्रे ज्युनियर कॉलेज या ठिकाणी त्यांचे कार्यालय असणार आहे. प्रभाग क्र मांक ४,५,६साठी हरिश्चंद्र पाटील (उपजिल्हाधिकारी, बोरीवली) यांची नियुक्ती केली आहे. खारघर सेक्टर ११मधील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात या तीन विभागांची निवडणूक कार्यालये असणार आहेत. प्रभाग क्र मांक ७, ८, ९, १० साठी उपेंद्र तामोरे (उपजिल्हाधिकारी, भांडुप) हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. श्री काळभैरव मंगल कार्यालय इमारत कळंबोली या ठिकाणी हे निवडणूक कार्यालय असणार आहे. प्रभाग क्र मांक ११,१२,१३ साठी तेजस समेळ (उपजिल्हाधिकारी भांडुप) हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, रयत शिक्षण संस्थेच न्यू इंग्लिश स्कूल कामोठे या ठिकाणी हे निवडणूक कार्यालय असणार आहे. प्रभाग क्र मांक १४,१५,१६साठी श्रीधर बोधे (उपजिल्हाधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे) हे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. कोकण एज्युकेशन सोसायटीचे के. व्ही. कन्याशाळेत हे कार्यालय असणार आहेत. प्रभाग क्र मांक १७,१८,१९,२० साठी ज्ञानेश्वर खुटवड (अतिरिक्त उपजिल्हाधिकारी) हे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. कोकण एज्युकेशन सोसायटीचे इंदाबाई वाजेकर इंग्रजी माध्यमिक शाळा पनवेल या ठिकाणी या प्रभागाचे निवडणूक कार्यालय असणार आहे.