शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

संत गाडगेबाबा उद्यान दुरूस्तीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 02:50 IST

प्रवेशद्वाराची डागडुुजी : ज्वेल आॅफ नवी मुंबईतील ‘हिरा’ही उजळला

नवी मुंबई : शहरातील स्वच्छतेचे प्रतीक असलेल्या नेरुळ येथील संत गाडगेबाबा उद्यानाच्या दुरवस्थेविषयी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली आहे. तत्काळ दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. पामबीच रोडवरील हिऱ्याच्या प्रतिकृतीमधील विद्युत पुरवठाही पूर्ववत सुरू केला आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये दोन वेळा राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. पुरस्काराच्या रकमेमधून नेरुळमध्ये आयुक्त बंगल्याच्या बाजूला संत गाडगेबाबा उद्यानाची निर्मिती केली आहे. कमी खर्चात अत्यंत चांगले उद्यान बनविण्यात आले असून, आतापर्यंत ६ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी उद्यानाला भेट दिली आहे. शाळांना सुट्टी पडल्यापासून उद्यानाला भेट देणाºया नागरिकांची संख्या वाढली आहे. उद्यानामध्ये जाणाºया नागरिकांनी तेथील दुरवस्था पाहून नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. उद्यानाचे प्रवेशद्वार व तिकीट खिडकीची रूम धोकादायक झाली आहे. आतमधील लहान मुलाच्या पुतळ्याचा हात तुटला आहे. धबधबा कोरडा झाला आहे सर्व तळ्यांमधील कारंजे आटले आहेत. कॅफेटेरीया अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. येथील समस्यांविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल प्रशासनाने घेतली आहे. उद्यानामध्ये धोकादायक ठरलेल्या प्रवेशद्वाराची दुरुस्ती सुरू केली आहे. उद्यानामधील इतर कामे करण्यासाठीचा पाठपुरावाही सुरू केला आहे.पामबीच रोडवरील ज्वेल्स आॅफ नवी मुंबईमधील हिºयाच्या प्रतिकृतीमधील विद्युत पुरवठाही अनेक दिवसांपासून बंद होता. नागरिकांनी प्रशासनाच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्यानंतरही विद्युत पुरवठा सुरू केला जात नव्हता. ‘लोकमत’ने याविषयी वृत्त प्रसिद्ध करताच तत्काळ विद्युत पुरवठा पूर्ववत केला आहे. हिरा पूर्ववत उजळल्यामुळे नागरिकांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.स्थायी समितीमध्ये पडसादसंत गाडगेबाबा उद्यानाच्या दुरवस्थेविषयी ‘लोकमत’च्या वृत्ताचे पडसाद स्थायी समितीमध्येही उमटले. भाजपा नगरसेवक सुनील पाटील यांनी प्रशासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले. उद्यानाची दुरवस्था झाली आहे. पुतळ्याचे हात तुटले आहे. कारंजे बंद आहेत. धबधबा बंद आहे. दुरवस्थेविषयी गांभीर्याने लक्ष देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई