शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

आग प्रतिबंधक उपाययोजनांना हरताळ

By admin | Updated: April 24, 2017 02:40 IST

खारघरमधील आदित्य प्लॅनेट या बारा मजली इमारतीच्या तळमजल्यावरील शोरूमला लागलेल्या आगीत दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

वैभव गायकर / पनवेलखारघरमधील आदित्य प्लॅनेट या बारा मजली इमारतीच्या तळमजल्यावरील शोरूमला लागलेल्या आगीत दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यात शोरूमचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे या इमारतीतील आग प्रतिबंधक यंत्रणा बंद असल्याचे उघडकीस आले आहे. केवळ या दुर्घटनाग्रस्तच नव्हे, तर पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील बहुतांशी उंच इमारतीत आग प्रतिबंधक नियमांना हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. सहा महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेत सिडको नोडसह तळोजा एमआयडीसीचा समावेश आहे. सिडको नोडमध्ये बहुमजली इमारती उभारल्या आहेत. नियमानुसार प्रत्येक इमारतीत आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यरत असणे गरजेचे असते. मात्र अनेक इमारतीत या नियमाला हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. खारघर-कोपरा सेक्टर १0 येथील आदित्य प्लॅनेट या बारा मजली निवासी इमारतीच्या तळमजल्यावर गाड्यांचे मोठे शोरूम आहे. या शोरूमला रविवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत दोन कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर विक्रीसाठी ठेवलेल्या दहापेक्षा अधिक नवीन गाड्या भस्मसात झाल्या. आग विझविण्यासाठी तब्बल चार तासांचे शर्थीचे प्रयत्न करावे लागले. इमारतीत आग प्रतिबंधक यंत्रणा आहे. परंतु ती कार्यरत नसल्याने आग विझविण्यासाठी अग्निशम दलाची प्रतीक्षा करावी लागली. या इमारतीत ६0 ते ७0 कुटुंब राहतात. आग वेळीच नियंत्रणात आली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. याची गंभीर दखल घेत संबंधित विभागाने या सोसायटीला नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सिडको नोडसह महापालिका क्षेत्रातील बहुमजली इमारतीतील आग प्रतिबंधक यंत्रणांची झाडाझडती घेण्याचा निर्णय अग्निशमन विभागाने घेतला आहे. तसेच आदित्य प्लॅनेट सोसायटीतील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील विविध शोरूम्सना नोटिसा बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पनवेल महापालिकेची लोकसंख्या बारा लाखांच्या घरात आहे. त्या तुलनेत महापालिकेकडे सध्या असलेली अग्निशमन यंत्रणा तोकडी आहे. नगरपालिकेच्या काळात असलेली तीच यंत्रणा सध्या कार्यरत आहे. कळंबोली, नवीन पनवेल व खारघर येथे सिडकोने उभारलेल्या अग्निशमन दल आहेत, परंतु ते अद्यापि महापालिकेकडे हस्तांतरित झालेले नाहीत. तळोजा एमआयडीसीची स्वत:ची यंत्रणा आहे, परंतु ती सुध्दा सक्षम नसल्याचे विविध घटनांतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एखादी आगीची दुर्घटना घडल्यास महापालिकेला सिडको किंवा नवी मुंबई महापालिकेवर विसंबून राहावे लागते. रविवारी आदित्य प्लॅनेट सोसायटीच्या तळमजल्यावरील शोरूमला लागलेली आग विझविण्यासाठी सर्वप्रथम नवी मुंबई महापालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पनवेल महापालिकेचे पथक आले. यावरून आगामी काळात आगीच्या दुर्घटनांचा सामना करण्यासाठी पनवेल महापालिकेला सक्षम यंत्रणा उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे.