शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

एसटीखाली महिला चिरडली

By admin | Updated: May 31, 2016 03:15 IST

दोन दिवसांपूर्वी लोधीवलीजवळील एसटीच्या अपघाताची घटना ताजी असतानाच रस्ता ओलांडत असताना एसटीच्या मागील चाकाखाली सापडून वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

वावोशी : दोन दिवसांपूर्वी लोधीवलीजवळील एसटीच्या अपघाताची घटना ताजी असतानाच रस्ता ओलांडत असताना एसटीच्या मागील चाकाखाली सापडून वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खालापूर हद्दीत चौक गावामध्ये घडली. एसटीचालक विठ्ठल मारुती श्यामे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते त्यांच्या ताब्यातील एसटी (एमएच २० बीएन १६७२) ही पनवेल ते कर्जत असे घेऊन जात होते. रविवारी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई -पुणे महामार्गावर चौक बस स्टॉपवर एसटी थांबली होती. प्रवासी घेतल्यानंतर एसटी कर्जतकडे जाण्यास निघाली असताना रस्ता ओलांडत असणारी कमल कुंभार (६०, रा. तुपगाव, चौक) एसटीच्या मागील चाकाखाली येऊन अपघात झाला. या अपघातात कमल कुंभार यांच्या पायावरून एसटीचे चाक गेल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने लोधीवली येथील धीरूभाई अंबानी रु ग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले. परंतु प्राथमिक उपचारानंतर कमल कुंभार यांना पनवेल येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान कमल कुंभार यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघाताची नोंद खालापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सहा. पोलीस उप निरीक्षक खरे करीत आहेत. (वार्ताहर)दासगांव : मुंबई-गोवा महामार्गावर सोमवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास सल्फर नेणाऱ्या आयचर टेम्पोला केंबुर्ली गावच्या हद्दीत रुची हॉटेलसमोर अपघात झाला. मात्र या गाडीमधील काही सल्फर महामार्गावर सांडल्याने या ठिकाणाहून जाणाऱ्या अनेक वाहनचालक तसेच प्रवाशांना मोठ्या प्रमाणात जवळपास पाच तास त्रास सहन करावा लागला. जयगड पोर्टवरून रोहा या ठिकाणी एका कारखान्याचा पिवळा सल्फर भरून जाणारा आयचर टेम्पो क्र. एम. एच. ०६ बीडी २४१ याला केंबुर्ली गावचे हद्दीत एका अज्ञात वाहनाची जोरात धडक बसली. यामध्ये टेम्पोच्या बॉडीचा भाग तुटला व गाडीमधील काही प्रमाणात सल्फर राष्ट्रीय महामार्गावर सांडत गेले. या अपघातानंतर रस्त्यावरु न जाणाऱ्या प्रवाशांना, या सल्फरचा मोठ्या प्रमाणात त्रास जाणवू लागला.डोके जड होणे, मळमळ होणे, डोळ्यात आग होणे असे अनेक त्रास सुरू झाले. काही काळानंतर महाड बिट मार्शलचे पो. कॉ. प्रशांत ठाकूर, पो. कॉ. राहुल मोहिते या ठिकाणी पोहोचले. मात्र अपघातानंतर टेम्पो चालक या ठिकाणाहून पसार झाला होता. पोलिसांनी वाहन मालक दिनेश भोसले (रा. रोहा) यांना बोलावून घेतले. गाडी ताब्यात घेत सर्व परिसरातील रसत्यावरील साफसफाई के ली. यासाठी पाच तास लागले.