शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
2
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
3
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
4
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
5
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
6
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
7
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
8
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
9
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
10
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
11
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
12
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
13
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
14
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
15
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
16
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
17
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
18
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
19
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
20
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!

नवीन पनवेलचे मैदान सेंट जोसेफच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 1:47 AM

नवीन पनवेल सेक्टर ७ मधील खेळाच्या मैदानावर सेंट जोसेफ हायस्कूलने एक प्रकारे कब्जा केला आहे. शाळा सुटल्यानंतरही हे मैदान स्थानिक मुलांना खेळण्याकरिता खुले करून दिले जात नाही

कळंबोली : नवीन पनवेल सेक्टर ७ मधील खेळाच्या मैदानावर सेंट जोसेफ हायस्कूलने एक प्रकारे कब्जा केला आहे. शाळा सुटल्यानंतरही हे मैदान स्थानिक मुलांना खेळण्याकरिता खुले करून दिले जात नाही. याबाबत माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली असता सिडको योग्य उत्तर देत नसल्याने याविरोधात राज्य माहिती आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे स्थानिक रहिवासी आनंद भंडारी यांनी सांगितले.सिडकोने शैक्षणिक संकुलांना भूखंड देत असताना त्यांना बाजूला खेळाचे मैदानही उपलब्ध करून देण्यात आले. शाळेच्या कालावधीत ते क्रीडांगण म्हणून विद्यार्थ्यांकरिता वापरायचे आणि त्यानंतर स्थानिक मुलांकरिता ते खुले करून देण्याची अट सिडकोने त्यावेळीच घातलेली आहे. परंतु बहुतांशी शाळांनी अटी शर्ती पालन न करता अशा मैदानावर एक प्रकारे कब्जा केला आहे. नवीन पनवेल सेक्टर ७ मध्ये सेंट जोसेफ हायस्कूल आहे. या शाळेने सुध्दा बाजूच्या प्ले ग्राऊंडमध्ये भिंत टाकून बंदिस्त केले आहे. त्याचबरोबर गेट बांधून त्याला टाळा ठोकला आहे. स्थानिक मुलांना शाळा सुटल्यानंतही या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही.सिडकोने प्लॅनमध्ये हे प्ले ग्राऊंड दाखविण्यात आले आहे. परंतु त्याचा सेक्टर ७मधील रहिवाशांना कोणताच फायदा नाही. याबाबत स्थानिक रहिवासी आनंद भंडारी यांनी माहिती अधिकारांतर्गत सिडकोकडे अर्ज केला होता. त्यामध्ये त्यांनी हा भूखंड आहे तो कोणाच्या मालकीचा आहे, त्याचबरोबर या ठिकाणी संरक्षक भिंत कोणी बांधली आहे. या व्यतिरिक्त मुलांना खेळण्याकरिता या सेक्टरमध्ये कुठे कुठे भूखंड शिल्लक आहेत ही माहिती मागितली होती. परंतु सिडकोने या सर्व प्रश्नांची उत्तरे टाळत फक्त कंपाउंड सिडकोने बांधले नाही इतकेच उत्तर दिले आहे. १ नोव्हेंबर रोजी जी.एस. देशपांडे आणि १० आॅक्टोबर रोजी विद्या रोकडे या दोनही सहायक कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाºयांनी एकच उत्तर दिले आहे. त्यामुळे बाकीचे प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. याबाबत अर्जदाराने संबंधित कार्यालयात जावून विचारणा केली असता या विषयी सेंट जोसेफ हायस्कूलकडे विचारणा करा असे सांगितले. एकंदरीत सिडको खरी माहिती टाळत आहेच, त्याचबरोबर संबंधित शाळा व्यवस्थापनाला पाठीशी घालत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या संदर्भात सहायक कार्यकारी अभियंता विद्या रोकडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रि या मिळू शकली नाही.