कळंबोली : पनवेल शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर पुन्हा स्पीडगनने नजर ठेवण्यास सुरु वात केली आहे. शहर वाहतूक शाखेने स्पीडगनच्या आधारे कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पनवेल शहरातून जाणाऱ्या मुंबई-पुणे महामार्गावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. शहरालगत उड्डाणपूल झाल्याने वाहने सुसाट जातात. त्यामुळे परिसरातील गार्डन हॉटेलजवळ पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडावा लागतो. पूर्वी वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येत असे. मात्र मध्यंतरी ही कारवाई थंडावल्याने वाहन चालकांमधील कारवाईची भीती कमी झाल्याने वेगमर्यादा वाढली होती. मात्र एक दीड महिन्यापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयास स्पीडगन गृहविभागाने दिल्या आहे. दोन वाहतूक शाखा मिळून अशा स्पीडगनचे वाटप करण्यात आले. पनवेल व नवीन पनवेल वाहतूक शाखेला एक स्पीडगन देण्यात आली आहे. त्या आधारे पोलीस निरीक्षक बाळासाहेब गाडे यांनी कारवाईला सुरु वात केली आहे. (वार्ताहर)
वेगमर्यादा ओलांडणाऱ्यांवर ‘स्पीडगन’ची नजर
By admin | Updated: October 29, 2015 23:44 IST