शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

क्लस्टरमुळे विकासाला गती

By admin | Updated: June 10, 2017 01:19 IST

उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबविण्याचा मार्ग मोकळा

नामदेव मोरे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेने योग्य वेळी तयार केलेल्या इम्पॅक्ट असेसमेंट (आघात मूल्यांकन) अहवालामुळे नवी मुंबईबरोबरच मुंबई, ठाण्यामधील पुनर्बांधणीचा मार्गही मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांसह गावठाण परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी क्लस्टर योजना राबविण्याचा व ४ चटईक्षेत्र देण्याचा निर्णय राज्य शासनाने २०१४ मध्ये घेतला होता. परंतु यामुळे शहरांमधील पायाभूत सुविधांवर ताण येईल अशी याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने या योजनेच्या अंमलबजावणीवर स्थगिती दिली होती. नवी मुंबई महानगरपालिकेने ही योजना राबविण्यासाठी इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार केला होता. सिडकोनेही त्यांचा अहवाल तयार केला होता. नवी मुंबई महापालिकेच्यानंतर मुंबई व ठाणे महापालिकेनेही त्यांचे अहवाल तयार करून राज्य शासनाकडे पाठविले आहेत. न्यायालयामध्ये शासनाने नवी मुंबई महापालिकेच्या अहवालाचा संदर्भ देवून इतर अहवाल प्राप्त झाल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर उच्च न्यायालयाने बंदी उठविली आहे. या निर्णयाचा सर्वाधिक लाभ मुंबई व ठाणे शहराला होणार आहे. ३० वर्षे जुन्या धोकादायक इमारतींच्या जागेवर क्लस्टर योजना राबविता येणार आहे. ४ हजार चौरस मीटरचा भूखंड व ७० टक्के रहिवाशांची परवानगी असल्यास ही योजना राबविणे शक्य होणार आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मूळ गावांमधील विकासाला क्लस्टरमुळे चालना मिळणार आहे. रहिवाशांची संमती असेल व अपेक्षित क्षेत्रफळाचा भूखंड असल्यास पुनर्बांधणी करता येणार आहे. याशिवाय भविष्यात कोपरखैरणे, नेरूळ, वाशी, तुर्भे, ऐरोली परिसरातील बैठ्या चाळींचा पुनर्विकास करणेही शक्य होणार आहे. वाशी, नेरूळ परिसरातील सिडकोच्या धोकादायक इमारतींच्या एकापेक्षा जास्त सोसायटी एकत्र करून ही योजना राबविणे शक्य होणार आहे. यामुळे नागरिकांना मोठी घरे उपलब्ध करून देणेही शक्य होणार आहे. महापालिका क्षेत्रामध्ये मोकळे भूखंड अत्यंत कमी असल्याने बांधकाम व्यवसायाला संधीच नव्हती. क्लस्टरमुळे बांधकाम व्यवसायालाही गती मिळणार आहे. शासन व महापालिकेने सकारात्मक प्रयत्न करावे अशाप्रतिक्रिया बांधकाम व्यावसायिक व नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.