शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशी खाडीवर लवकरच तिसरा पूल, मंजुरीनंतर प्राथमिक कार्यवाही सुरू, वाहतूककोंडीला बसणार आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 01:15 IST

सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडी पुलावर तिसरा पूल बांधला जाणार आहे. सायन-पनवेल महामार्गावरील वाढती रहदारी, पुलावर येणारा वाहनांचा भार आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडी पुलावर तिसरा पूल बांधला जाणार आहे. सायन-पनवेल महामार्गावरील वाढती रहदारी, पुलावर येणारा वाहनांचा भार आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा पूल बांधला जाणार आहे. सध्या प्राथमिक स्तरावर या संदर्भात कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्राने दिली.वाशी खाडी येथे मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा आणखी एक पूल उभारण्यात यावा, अशी मागणी गेल्या दहा वर्षांपासून आहे. आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची उभारणी करावी, अशा स्वरूपाची चर्चाही सुरू होती. आॅक्टोबर २0१५मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या पुलाच्या बांधणीबाबत चर्चाही झाली होती, परंतु मागील दोन वर्षांत कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. मात्र, गेल्या वर्षी पुन्हा कार्यवाही सुरू करण्यात आली होती. या पुलाच्या बांधकामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी रस्ते विकास महामंडळावर सोपविण्यात आली होती. अहवालाच्या आधारे १३ जून २0१७ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत सायन-पनवेल महामार्गावर वाशी येथे तिसºया पुलाच्या उभारणीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या पुलाची निर्मिती करावी, यासाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचा राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार, मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने या पुलाच्या निर्मितीस मंजुरी दिल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदा म्हात्रे यांना कळविले आहे.मुंबई व नवी मुंबईला जोडणाºया सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. दोन्ही बाजूने महामार्ग रुंदावला असला, तरी सध्या वापर असलेल्या वाशी खाडीवरील पुलाची रुंदी वाढलेली नाही. या पार्श्वभूमीवर तिसरा खाडी पूल उपयुक्त ठरणार आहे.महामार्गावर वाहनांचा अतिरिक्त ताणबांधकाम विभागाने त्या वेळी केलेल्या सर्वेक्षणात या पुलावरून दररोज सरासरी १२,५00 एवढ्या संख्येने वाहनांची ये-जा असेल, असे गृहीत धरले होते, परंतु मागील काही वर्षांत या पुलावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे. या पुलावरून सध्या दररोज सरासरी दोन ते अडीच लाख वाहने ये-जा करतात. त्यामुळे वाहनांचा ताण पडत असल्याने, महामार्गावर वाहतूककोंडी होत आहे.वाशी खाडीवर १९७0 ते ७५ या कालावधीत पहिला पूल उभारण्यात आला होता, पण अतिवापरामुळे हा खाडी पूल कमकुवत झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर, सार्वजनिक बांधकाम विभागाने १९९0 ते ९५दरम्यान त्यालगतच दुसºया खाडीपुलाची उभारणी केली होती.