शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

ठाण्यात लवकरच नाटय़ जल्लोष महोत्सव

By admin | Updated: October 28, 2014 23:00 IST

ठाण्यातील गरीब वस्त्यांमधून राहणारे व योग्य संधी न मिळाल्यामुळे दुर्लक्षित राहणारे कलाकर शोधून त्यांना भविष्यात रंगकर्मी म्हणून कारकीर्द मिळवून देण्याची संधी मिळावी

ठाणो :  ठाण्यातील गरीब वस्त्यांमधून राहणारे व योग्य संधी न मिळाल्यामुळे दुर्लक्षित राहणारे कलाकर शोधून त्यांना भविष्यात रंगकर्मी म्हणून कारकीर्द मिळवून देण्याची संधी मिळावी यासाठी ज्येष्ठ रंगकर्मी व साहित्यिक र}ाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेली पहिला वाहिला नाटय़जल्लोष महोत्सव हळूहळू ठाण्यात आकारास येऊ लागला आहे. 
कला, क्रीडा, साहित्य, कलाकारी, अदाकारी व या सा:याच्या अभिव्यक्तीमधून वंचित समूहातील युवा पिढीला व्यासपिठ मिळवून देण्यासाठी ठाण्यात  क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या येत्या जयंतीदिनी जानेवारी महिन्यात या नाटय़ महोत्सवाचे आयोजन होणार आहे. त्याच्या तयारीने आता वेग पकडला आहे, अशी माहिती र}ाकर मतकरींनी ठाण्यात नुकत्याच आयोजित दुस:या बैठकीत दिली. यावेळी समता विचार प्रसारक संस्थेचे अध्यक्ष जगदीश खैरालिया होते.
ठाण्यात खारटन रोड, नागसेन नगर, राबोडी, माजिवाडा, मानपाडा, ढोकाळी, मनोरमा नगर, सावरकर नगर, येवून , लोकामान्य नगर, वागळे इस्टेट, यशोधन नगर आदी भागातून नाटय़ जल्लोषमध्ये सामील होण्यासाठी युवकांची बांधणी सुरु झाली असून सुमारे 15 नाटय़ गटांची गटबांधणी आकारास येऊ लागली असल्याची माहिती संस्थेच्या कार्यवाहक व गटबांधणी समिती संयोजक लतिका सु. मो. यांनी दिली.
या महोत्सवाचा भाग म्हणून 2क् नोव्हेंबर र्पयत सर्व गट बांधणी पूर्ण करण्याचा मनोदय या बैठकीत व्यक्त करण्यात आला. त्यानंतर सुमारे महिनाभर या गटांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील भेडसावणा:या विविध प्रश्नांवर, आपआपल्या क्षमतेनुसार 15 ते 2क् मिनिटांचे नाटय़ रुप उभे करायचे आहे. या नाटय़रुपाची लेखन, भाषा, नेपथ्य, संगीत आदींबाबत कोणतेही नियम वा बंधने नसतील,  असे मतकरी यांनी स्पष्ट केले. उलट स्वत:चे विचार स्वत:च्या पध्दतीने त्यांनी सादर करणो हेच अभिप्रेत आहे, असे त्यांनी सांगितले. 
नाटय़ - चित्रपट सिरियल्स क्षेत्रत दैदीप्यमान कामगिरी असणारे काही प्रतिथयश कलाकार या गटांना 
स्वमत - स्वभाव - स्व जाणिवा प्रभावीपणो अभिव्यक्त करण्यास मदतनीस म्हणून काम करणार 
आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी सुहास 
जोशी, उदय सबनीस, सुप्रिया 
विनोद, विजू माने, अरुंधती भालेराव यांनी याकामी संपूर्ण सहका:याचे आश्वासन दिले असून हर्षदा बोरकर, मीनल उत्तूरकर, कल्पना भांडारकर, संजय निवंगुणो, हर्षलता कदम, शोभाताई वैराळ इत्यादी कार्यकर्ते गटबांधणीच्या कामात जोमाने कार्यरत आहेत.
 
या महोत्सवासाठीचा निधी दुहेरी पध्दतीने उभारण्याची योजना बालनाटय़ाच्या प्रतिभा मतकरी व समता विचार प्रसारक संस्थेचे डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी सांगितले. एकीकडे विविध संवेदनशील आस्थापनातील अधिकारी व उद्योजकांच्या माध्यमातून प्रायोजकत्व मिळवून व स्मरणिका प्रकाशित करुन निधी संकलन होणार असून दुसरीकडे सर्व सामान्य जनता व गरीब वस्त्यांमधूनही शक्य तेवढा निधी उभारला जाणार आहे. या महोत्सवाच्या गट बांधणी समिती सोबतच प्रत्यक्ष महोत्सव आयोजनाकामी जिज्ञासा ट्रस्टचे सुरेंद्र दिघे, वी नीड यू सोसायटीचे जयंत कुलकर्णी, जागचे मिलिंद गायकवाड, रंगकर्मी मकरंद तोरसकर प्रभूतींची ‘नाटय़ जल्लोष व्यवस्थापन समिती’ गठित करण्यात आह़े