शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांविरोधात लवकरच शोध मोहीम; आरोग्य सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने पनवेल पालिकेच्या उपाययोजना  

By वैभव गायकर | Updated: October 18, 2023 16:18 IST

खाजगी डॉक्टरांची पालिकेकडे नोंदणी असल्यास पालिका क्षेत्रातील डॉक्टरांची आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध होईल.

पनवेल:पनवेल महानगरपालिकेने आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.यादृष्टीने पालिका क्षेत्रात 12 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र कार्यरत आहेत.तसेच पालिका हद्दीतील खाजगी डॉक्टरांची माहिती आपल्याकडे उपलब्ध असावी यादृष्टीने पालिकेने केलेल्या अवाहनाला खाजगी डॉक्टरांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेकडून लवकरच विशेष मोहीम राबविली जाणार आहे.

खाजगी डॉक्टरांची पालिकेकडे नोंदणी असल्यास पालिका क्षेत्रातील डॉक्टरांची आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध होईल. 2021- 22 मध्ये केलेल्या अवाहनाला प्रतिसाद मिळत नाही.केवळ 15 ते 20 डॉक्टरांनी पालिकेकडे नोंदणी केली आहे.वारंवार अवाहन करून देखील पालिकेच्या आरोग्य प्रशासनाला प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी भरारी पथक स्थापन करून पालिका हद्दीतील खाजगी डॉक्टरांची तपासणी मोहीम हाती घेण्याचे निश्चित केले आहे.

आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहीम लवकरच सुरु होणार आहे.या मोहिमेत डॉक्टरांची मान्यताप्राप्त मिडिकल कौन्सिल च डिग्री,मिळालेल्या डिग्रीच्या आधारावर रुग्णांचे उपचार होते का ?,प्रॅक्टिस करताना वैद्यकीय विभागाचे नॉर्म्स पाळले जातात का ? आदींसह वैद्यकीय विभागाच्या निगडित चौकशी पालिकेचे पथक करणार आहे.वाढत्या बाळ माता मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टीने तसेच डेंग्यू आणि मलेरिया सारख्या रुग्णांची अद्ययावत माहिती पालिकेला उपलब्ध होण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी पुढाकार घेतला आहे.

शासनाच्या माता बाळ मृत्युदर कमी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अन्वेषक कमिटीच्या बैठकीत देखील याबाबत चर्चा करण्यात आली.पनवेल महानगरपालिका हद्दीत 600 ते 700 खाजगी डॉक्टर प्रॅक्टिस करतात.मात्र यापैकी केवळ 15 ते 20 डॉक्टरांनीच पालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी केली आहे.याकरिता परिपत्रक काढुन देखील खाजगी डॉक्टर पालिका प्रशासनाला जुमानत नसल्याचे दिसुन येत आहे.

औषधोपचार होत आहे.रात्रीच्या वेळेला आपला दवाखाना देखील कार्यान्वित करण्यात आला आहे.असे असताना तळोजा एमआयडीसी सारख्या ठिकाणी अशिक्षित मजूर वर्गाचा फायदा घेत काही खाजगी डॉक्टर या रुग्णांवर उपचार करतात.सहज डॉक्टर उपलब्ध होत असल्याने मजूरवर्ग तसेच गरीब रुग्ण या डॉक्टरांकडे धाव घेतात.या डॉक्टराकडे वैद्यकीय डिग्री आहे का अशा डॉक्टारांचा देखील पालिका शोध घेणार आहे.

700 डॉक्टरांपैकी 20 जणांची नोंदणी -पालिका हद्दीत जवळपास 700 खाजगी डॉक्टर वेगवेगळ्या शहरात,ग्रामीण भागात तसेच एमआयडीसी परिसरात प्रॅक्टिस करत आहेत.या डॉक्टरांकडून शेकडो रुग्णांची तपासणी नियमित केली जाते.यामध्ये डेंग्यू आणि मलेरिया सारख्या रुग्णांचा समावेश आहे.मात्र हि माहिती पालिका प्रशासनाला उपलब्ध होत नाही.

सर्व खाजगी डॉक्टरांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे स्वतःची डिग्री आणि क्लिनिकची माहिती लवकरात लवकर पालिकेकडे द्यावी.जेणे करुन माता बाळ मृत्यू ,साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यास पालिकेला मदत होईल.- डॉ आनंद गोसावी (मुख्य वैद्यकीय अधिकारी,पनवेल महानगरपालिका )

टॅग्स :docterडॉक्टरNavi Mumbaiनवी मुंबई