शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 00:33 IST

सर्वसमावेशक धोरण तयार करण्याच्याही सूचना

नवी मुंबई : नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात यावा. भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन पुनर्विकासाचे सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात यावे, असे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोला दिले आहेत.सिडकोच्या विविध प्रकल्पांचा नगरविकासमंत्र्यांनी गुरुवारी आढावा घेतला. या बैठकीला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबईमधील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. ही घरे नियमित करण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. यामधील अनेक घरे जुनी आहेत. या घरांविषयी प्रकल्पग्रस्तांचे समाधान होईल, अशाप्रकारचे धोरण आखण्यात यावे. घरांचे धोरण आखण्यासाठी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रथम लोकांचा विश्वास संपादन करण्यात यावा. गैरसमज दूर करा, सर्वेक्षण केल्याशिवाय निश्चित लाभ देणारी योजना तयार करता येणार नाही हे त्यांना पटवून द्या. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या आणि सूचनांचा विचार करून योजनेत आवश्यक ते बदल करण्याची लवचिकता ठेवा, असेही नगरविकासमंत्र्यांनी या बैठकीत सूचित केले. प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.पाणीपुरवठा योजनांना गती द्यासिडकोच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प सुरू केले आहेत. परवडणाºया घरांचे अनेक प्रश्न सिडको कार्यक्षेत्रामध्ये सुरू आहेत. यामुळे भविष्यात सिडको क्षेत्रातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हे लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचा सविस्तर आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचनाही या बैठकीत नगरविकासमंत्र्यांनी दिल्या. सिडकोच्या पाणीपुरवठ्याच्या ज्या प्रस्तावित योजना आहेत, त्यांना गती देण्यासाठी राज्य शासन आवश्यक ती सर्व पावले उचलेल, अशी ग्वाहीही या वेळी प्रशासनास देण्यात आली.

टॅग्स :cidcoसिडकोEknath Shindeएकनाथ शिंदे