शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सोलनपाडा धरण ओव्हरफ्लो

By admin | Updated: July 12, 2016 02:46 IST

पावसाचा जोर कायम असल्याने कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरण ओव्हरफ्लो झाले. मागील आठवड्यात धरणात पाणी नव्हते,

नेरळ : पावसाचा जोर कायम असल्याने कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरण ओव्हरफ्लो झाले. मागील आठवड्यात धरणात पाणी नव्हते, त्यामुळे संतप्त पर्यटकांनी सोशल मीडियावर फिरत असलेल्या पोस्टबाबत आगडपखाड केली होती. मात्र गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे १० जुलै रोजी (रविवारी) सोलनपाडा धरण भरल्यानंतर त्याच्या सांडव्यामधून पाणी बाहेर पडू लागले. धरण ओव्हरफ्लो होतानाचा अनुभव हजारो वर्षा सहलप्रेमींनी घेतला.जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे खात्याने बांधलेल्या जामरुख सोलनपाडा येथील पाझर तलावाची दुरुस्ती करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी या तलावाची दुरुस्ती केल्यानंतर सांडवा नव्याने बांधण्यात आला होता. धरण पूर्ण भरल्यानंतर अतिरिक्त पाणी सांडव्यामधून बाहेर पडते, त्या ठिकाणी भिजण्याचा आनंद घेण्यासाठी गेल्यावर्षी वर्षा सहलप्रेमी पावसाळ्यात आले होते. त्यावेळी एका पर्यटकाचा मृत्यू देखील झाला होता. मात्र याचा पर्यटकांवरकाहीही परिणाम न झाल्याचे येथील गर्दीवरून दिसून येत आहे. सोशल मीडियावर पावसाळा सुरू होताच गेल्यावर्षी भरून वाहणाऱ्या धरणाचे फोटो व्हायरल होत होते. त्यामुळे मागील रविवारपर्यंत गर्दीने येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला होता. कारण ३ जुलैपर्यंत धरणाच्या जलाशयात देखील पाणी साठलेले नव्हते. परंतु मागील चार दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने सोलनपाडा धरण रविवारी पूर्ण भरले. शनिवार ९ जुलै रोजी धरणाच्या जलाशयामध्ये जेमतेम पाणीसाठा असल्याने पर्यटक आणि स्थानिक प्रचंड नाराज झाले होते. स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देणाऱ्या या सोलनपाडा धरणाच्या भरण्याची वाट सर्व पाहात असताना १० जुलै रोजी धरण भरले. त्यावेळी हजारोंच्या संख्येने पर्यटक आले असल्याने सांडवा पहिल्यांदा कसा वाहतो याचा वेगळा अनुभव पर्यटकांनी घेतला.रविवारी दुपारनंतर ही माहिती सर्व ठिकाणी पोचली असता पर्यटकांची गर्दी वाढली. परिणाम सोलनपाड्याकडे जाणारे रस्ते वाहतूककोंडीत सापडले. आंबिवलीपासून सोलनपाडा गावापर्यंत म्हणजे ८ किलोमीटर परिसरात वाहतूककोंडी दुपारपासून झाली होती. स्थानिक सोलनपाडा ग्रामस्थ आणि टेंबरे ग्रामपंचायतीने वाहतूककोंडी होणार नाही याची काळजी घेतली होती. यावेळी चोख पोलीस बंदोबस्तही होता. (वार्ताहर)