शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडी मंडळांची सामाजिक बांधिलकी, केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात, सीमेवरील हुतात्मांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 04:29 IST

केरळात झालेल्या महाप्रलयामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेकडो जण मृत्युमुखी पावले आहेत. आजही या भागात पुनर्वसनाचे काम सुरू आहे. नवी मुंबईतील काही दहीहंडी उत्सव मंडळांनी या कार्यात हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे.

- अनंत पाटीलनवी मुंबई : केरळात झालेल्या महाप्रलयामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेकडो जण मृत्युमुखी पावले आहेत. आजही या भागात पुनर्वसनाचे काम सुरू आहे. नवी मुंबईतील काही दहीहंडी उत्सव मंडळांनी या कार्यात हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. उत्सवावर अधिक खर्च न करता केरळ पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय काही मंडळांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर शत्रूशी लढताना हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. प्लॅस्टिक बंदीसाठी गोविंदा पथकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले जाणार आहे.शिरवणे गावातील मंडळांकडून स्वच्छतेचा संदेश दिला जाणार आहे.ऐरोली सेक्टर १६ येथील श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयाच्या मैदानात सुनील चौगुले स्पोटर््स असोसिएशनच्या माध्यमातून मोठ्या बक्षिसाची दहीहंडी बांधली जाते. परंतु यावर्षी बक्षिसातील काही रकम केरळ पूरग्रस्तांसाठी देणार असल्याचे या दहीहंडीचे आयोजक तथा महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी स्पष्टकेले आहे.ही आर्थिक मदत वाशीतील केरळ भवनमध्ये जमा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशाच्या सीमेवर धारातीर्थी पडून हुतात्मा झालेल्या जवानांना सामूहिक श्रद्धांजली वाहिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. घणसोली गावात संस्कार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि आयोजक अंकुश पांडुरंग नाईक यांनी घणसोलीत स्वर्गीय बाळाजी आंबो पाटील महापालिका शाळेच्या मैदानात दहीहंडीचे आयोजन केले आहे. या माध्यमातून प्लॅस्टिक बंदीबाबत नागरिकांत जनजागृती केली जाणार असल्याचे अंकुश नाईक यांनी सांगितले.वाशी सेक्टर १ येथे श्री गणेश बाल मित्र मंडळाच्या वतीने आयोजक शंकर ऊर्फ बाबा पुजारी यांनी एक लाखाचे पारितोषिक असलेली दहीहंडी जाहीर केली आहे. तसेच केरळ पूरग्रस्तांनाही आर्थिक मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिरवणे गावात विनोद-सारिका कला क्र ीडा मंडळाने महापालिका शाळेजवळ दहीहंडीचे आयोजन केले आहे.स्वच्छतेचा संदेश देत ‘सुंदर नवी मुंबई आणि स्वच्छ नवी मुंबई’चा जागर करण्याचा मंडळाचा संकल्प असल्याची माहिती महापौर जयवंत सुतार यांनी दिली.नवी मुंबईत ५० टक्के दहीहंड्या रद्दपोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर नवी मुंबईमधील अनेक प्रमुख मंडळांनी दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक मंडळांनी केरळ आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरखैरणेत डी मार्ट मॉलसमोर वनवैभव कला व क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षी लाख मोलाच्या पारितोषिकांची दहीहंडीची परंपरा गेल्या वर्षीपर्यंत सुरू होती.

टॅग्स :Dahi Handiदही हंडी