शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

फ्लॉवरच्या पाल्यातून सामाजिक संस्था मालामाल, पूर्वाश्रमीचे ठेकेदार आता बनले व्यवस्थापक

By नामदेव मोरे | Updated: January 16, 2025 13:03 IST

मुंबईतील भाजीपाला मार्केट १९९६ मध्ये नवी मुंबईत स्थलांतर झाले.

नवी मुंबई : बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमधील कोबी, फ्लॉवरचा कचरा उचलण्यासाठीचा संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू आहे.  सामाजिक संस्थांच्या नावाखाली हा कचरा उचलण्यात येत आहे. दहा वर्षांत चार संस्थांनी कचरा उचलण्याचे काम करून आर्थिक कमाई केली आहे. संस्था बदलल्या असल्या तरी प्रत्यक्षात राबणारे व राबवून घेणारे हात मात्र वर्षांनुवर्ष तेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मुंबईतील भाजीपाला मार्केट १९९६ मध्ये नवी मुंबईत स्थलांतर झाले. मुंबईतून मार्केट स्थलांतर होत असताना तेथील गुन्हेगारीची मुळेही नवी मुंबईत स्थलांतरित झाली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनेकांनी मार्केटमध्ये विविध प्रकारच्या कामांत हस्तक्षेप केले व त्या माध्यमातून अर्थार्जन करण्यास सुरुवात केली.  मार्केटमध्ये रोज कोबी फ्लॉवरची ३०० ते ४०० टन आवक होती. त्यांचा पाला कचरा म्हणून टाकून दिला जातो. रोज १२ ते १५ टन पाला तयार होतो. कचऱ्यात टाकलेला हा पाला उचलून तबेलाचालकांना पुरविण्याचे काम तीन ते चार  गट करतात. यामधील काहींचे गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचेही बोलले जाते. पूर्वी वैयक्तिक स्तरावर पाला उचलला जात होता. 

पाला उचलण्याच्या संघर्षातूनच झाला गाेळीबारसुरुवातीला अनेक वर्षे शिव चॅरिटेबल ट्रस्ट हे काम करीत होती. यानंतर कर्तव्य सामाजिक संस्था व  जय शंभोनारायण संस्था काम करत असल्याची माहिती बाजार समितीमधील काही घटकांनी दिली. अखेर राजाराम टोके यांच्या शेतकरी भाजीपाला पुरवठा सहकारी संस्थेने शासनाकडे पाठपुरावा करून हे काम मिळविले. पाला उचलण्यासाठी या संस्था व त्यांचे चालक यांच्यामध्ये नेहमीच संघर्ष होत असून, यातूनच टाेकेंवर गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. 

पूर्वाश्रमीचे ठेकेदार आता बनले व्यवस्थापकगोळीबारप्रकरणी अटक केलेला संतोष गवळी हा अनेक वर्षांपासून कोबी, फ्लॉवरचा कचरा उचलण्याचे काम करत होता.परंतु, शासनाने हे काम राजाराम टोके यांच्या संस्थेला दिल्यानंतर तो टोके यांच्या संस्थेमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता. तशा प्रकारचे ओळखपत्रही त्याच्याकडे होते. गवळीबरोबर इतर ठेकेदारांकडेही व्यवस्थापकाचे व काम करणाऱ्यांकडे कामगार म्हणून ओळखपत्रे  आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती