शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दिंडीच्या माध्यमातून दिला सामाजिक संदेश

By admin | Updated: July 16, 2016 02:08 IST

लोकमत माध्यम प्रायोजक आणि सीबीडीतील भारती विद्यापीठ प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी दिंडी सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते

नवी मुंबई : लोकमत माध्यम प्रायोजक आणि सीबीडीतील भारती विद्यापीठ प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी दिंडी सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. माउलींचा जयघोष करत सीबीडी परिसरातून निघालेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी पर्यावरणाविषयी जनजागृती केली. बालवारकऱ्यांनी स्वत: तयार केलेले जल हैं तो कल हैं, झाडे लावा झाडे जगवा, रस्ता सुरक्षा अशा विविध घोषणा फलकांनी परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृतीही केली. महाराष्ट्राच्या संस्कृतीतून एकात्मतेचा संदेश दिला जात असून, याच एकतेमधून पर्यावरण संवर्धनाविषयी सकारात्मक पाऊल उचलण्याच्या दृष्टीने या आगळ््या वेगळ््या दिंडी सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी पालखी पूजन, विठूनामाचा गजर, पारंपरिक वेशभूषा, टाळ मृदंगाचा नाद याचबरोबर पर्यावरण जपण्याचे प्रयत्न या माध्यमातून केल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. कासारे यांनी दिली. दिंडीमध्ये साडेसहाशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या दिंडी सोहळ््यात विद्यार्थ्यांबरोबरच शाळेचे शिक्षकवृंदही सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची माहितीही देण्यात आली. सामाजिक संदेश देणाऱ्या या दिंडी सोहळ््यातून संपूर्ण सीबीडी परिसरात स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यात आला. आध्यात्मिक परंपरेचे महत्त्व सांगतानाच या दिंडीच्या माध्यमातून शहर स्वच्छतेचा संदेश नागरिकांमध्ये पोहोचविण्यात आला.याप्रसंगी दिंडी कार्यक्रमात शाळेचे पर्यवेक्षक एकनाथ दांडगे, शिक्षक नरेश लोहार, आर. बोबडे, समीर कोकाटे, रामचंद्र देवकर, प्राथमिक विभागाच्या मैथिली कदम आदी मान्यवर उपस्थित होते.