शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मासळी मार्केटमध्ये सामाजिक अंतराचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 00:13 IST

घणसोलीतील स्थिती; मासिक भाडे भरणाऱ्या महिलांचा व्यवसाय धोक्यात

नवी मुंबई : घणसोली गावातील मासळी बाजारात महापालिकेने काही मासळी विक्रेत्यांना व्यावसायिक गाळे मासिक भाड्याने दिलेले आहेत, तर काहीना ओटे बांधून दिले असून, त्या ठिकाणी मासळी विक्रेत्या महिलांना जागेची अडचण असल्याने मार्केट सोडून बाहेर विक्रीसाठी बसावे लागते. आठवड्यातील तीन दिवस या मार्केटमध्ये मासळी खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्यामुळे, कोरोनाच्या काळात सामाजिक अंतरांच्या नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळते.या मासळी मार्केटच्या आवारात महापालिकेने ६७४ चौ.फूट क्षेत्रफळाचे प्रत्येकी एकूण ९ व्यावसायिक गाळे बांधले आहेत, तर मार्केटच्या आतमध्ये १८ ते २० ओटले बांधून दिले आहेत. तीन वर्षांपूर्वी या गाळ्याचे मासिक भाडे केवळ २२५ रुपये होते. गेल्या दोन वर्षांपासून २,७५० रुपये मासिक भाडे आकारले जाते. म्हणजे दोन वर्षांत थेट २,५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सुविधा मात्र काहीच नसल्याचे गाळेधारकांचे म्हणणे आहे, तर मार्केटच्या आत महापालिकेने १८ ते २० ओटले बांधले आहेत. त्यांना मासिक भाडे नाही, असे गाळेधारकांचे म्हणणे आहे. असे असतानाही अनेक विक्रेत्या महिला ओटे दिलेल्या ठिकाणी न बसता गाळे असलेल्या ठिकाणी, तसेच रस्त्यावर व्यवसाय करीत असल्याने गाळे उघडण्यास नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची या महिलांची तक्रार आहे. मासिक भाडे भरणाºया महिलांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्यामुळे त्यांची बसण्याची सोय महापालिकेने अन्यत्र करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मासळी मार्केट आवारात आठवड्यातील बुधवार, शुक्रवार आणि रविवारी मासळी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याने, सरकारच्या सोशल डिस्टन्सच्या नियमांचा अक्षरश: फज्जा उडाल्याचे चित्र घणसोली परिसरात पाहावयास मिळते.पालिकेचे दुर्लक्ष : मासळी विक्रीसाठी ज्यांना महापालिकेने ओटले वाटप केले आहेत, त्यांनी त्याच ठिकाणी बसावे, जेणेकरून मासिक भाडे भरणाºया मासळी विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही. अशी तक्रार घणसोली विभाग अधिकाऱ्यांकडे करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची टीका होत आहे.