शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

झोपडपट्ट्यांना भूस्खलनाचा धोका, वृक्षतोड करून जेसीबीच्या साहाय्याने डोंगरामध्ये सपाटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:53 IST

नामदेव मोरेनवी मुंबई : एमआयडीसीसह सीबीडी परिसरामध्ये डोंगर पोखरून झोपड्या उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. वृक्षतोड करून जेसीबीच्या साहाय्याने डोंगरामध्ये सपाटीकरण केले जात आहे. या अतिक्रमणामुळे भूस्खलन होऊन मोठी माळीण सारखी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात असून, १० हजार नागरिकांवर अपघाताचे सावट निर्माण झाले आहे. पालिकेने धोकादायक वसाहती घोषित ...

नामदेव मोरेनवी मुंबई : एमआयडीसीसह सीबीडी परिसरामध्ये डोंगर पोखरून झोपड्या उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. वृक्षतोड करून जेसीबीच्या साहाय्याने डोंगरामध्ये सपाटीकरण केले जात आहे. या अतिक्रमणामुळे भूस्खलन होऊन मोठी माळीण सारखी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात असून, १० हजार नागरिकांवर अपघाताचे सावट निर्माण झाले आहे. पालिकेने धोकादायक वसाहती घोषित केल्या असल्या, तरी प्रत्यक्षात त्या वसाहतीच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक अद्याप लावलेले नाहीत.झोपड्या उभारण्यासाठी डोंगर पोखरल्यामुळेच सीबीडीमध्ये भूस्खलन झाल्याचे प्राथमिक पाहणीमध्ये स्पष्ट झाले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जेसीबीच्या साहाय्याने डोंगरावरील माती पोखरून सपाटीकरण करण्यात आले होते. मातीचे ढिगारे महापालिकेने बांधलेल्या गटारांमध्ये ढकलण्यात आले होते. यामुळेच सोमवारी रात्री भूस्खलन होऊन कल्पतरू सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली. या ठिकाणी दुर्गामाता झोपडपट्टीला लागून नवीन वसाहत उभी राहू लागली आहे. डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळांचे बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. वृक्षतोड व खोदकामामुळे जमीन खचण्याची शक्यता वाढली आहे. नवी मुंबईमध्ये दिघा ते सीबीडीपर्यंत डोंगर पोखरून झोपडपट्ट्या उभारण्यात आल्या आहेत. नेरुळमधील रमेश मेटल कॉरीही पूर्णपणे डोंगर उतरावर वसली आहे. या ठिकाणी दरड कोसळण्याची व भूस्खलन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच परिसरामध्ये महात्मा गांधी झोपडपट्टीमध्येही डोंगराचा भाग कोसळून अपघाताची शक्यता आहे. तुर्भेमध्ये इंदिरानगर झोपडपट्टी, रबाडे- भीमनगर, अश्विन क्वारी, आंबेडकरनगर झोपडपट्टी, इलठाणपाडा झोपडपट्टी परिसरामध्येही जमीन खचण्याची शक्यता आहे.महापालिका प्रत्येक वर्षी भूस्खलन होण्याच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करत होती. धोकादायक ठिकाणांची माहिती देणारे फलक लावण्यात येत होते. मदत करणाºया संस्था, नागरिकांच्या राहण्याची-जेवणाची सोय कुठे केली जाणार, या सर्व गोष्टींची माहिती प्रकाशित करून ती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविली जात होती; परंतु दोन वर्षांपासून महापालिकेच्या आपत्कालीन आराखड्याच्या पुस्तिकाच प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे आपत्ती ओढावल्यास मदत उपलब्ध करून देणे अवघड होणार आहे. डोंगर उतारावर झोपड्यांचे अतिक्रमण थांबविण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. बंद दगडखाणींच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झोपड्या बांधण्यात आल्या असून, त्याही धोकादायक स्थितीमध्ये आहेत. धोकादायक ठिकाणी असलेल्या अनधिकृत झोपड्या हटविण्याकडेही दुर्लक्ष केले जात असून, अशीच स्थिती राहिली तर भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते.प्रशासनाचे कारवाईचे आदेशसीबीडीमध्ये भूस्खलन झालेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय डोंगरामध्ये काही धार्मिक स्थळांचेही बांधकाम करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी तत्काळ नवीन झोपड्या हटविण्यात याव्यात, असे आदेश दिले आहेत.सिडकोसह वनविभागाचेही दुर्लक्षसीबीडीमध्ये वनविभाग व सिडकोच्या जमिनीवर अतिक्रमण झाले. डोंगर उतारावर जेसीबीच्या साहाय्याने सपाटीकरण करून झोपड्या व मंदिरे उभारण्यात येत आहेत. यामुळे भविष्यात भूस्खलन होण्याची शक्यता वाढली आहे. सिडको व वनविभाग या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. महापालिका प्रशासनही कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.दगडखाणी सर्वाधिक धोकादायकदगड खाणी परिसरामध्ये दाटी - वाटीने झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. नाल्याच्या काठावर व दरडींवरही बांधकामे केली आहेत. नाल्यातील पाणी झोपड्यांमध्ये जाऊन व दरडी कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे बंद दगडखाणींमधील अतिक्रमण पाडून ते भूखंड मोकळे करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.