शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांना गुलामगिरीची वागणूक

By admin | Updated: July 8, 2015 00:36 IST

महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या ५०७५ कंत्राटी कामगारांना ठेकेदार गुलामाप्रमाणे वागवत आहेत.

नामदेव मोरे  नवी मुंबईमहापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या ५०७५ कंत्राटी कामगारांना ठेकेदार गुलामाप्रमाणे वागवत आहेत. भविष्यनिर्वाह निधी व इतर गैरसोयींविरोधात आवाज उठविणाऱ्या कामगारांवर आकसाने कारवाई केली जात आहे. काही कामगारांना चक्क कामावरून काढून टाकण्यात आले आहे. महानगरपालिकेने कामकाजाच्या सुलभतेसाठी १२ विभागांत कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली आहे. शहरातील साफसफाई करणे, कचरा उचलणे, पाणी सोडणे, रुग्णालय़्ा, स्मशानभूमीची साफसफाई, आरोग्य व शिक्षण विभागांत तब्बल ५०७५ कामगार काम करत आहेत. कंत्राटी कामगारांना समान वेतन देणारी देशातील एकमेव महापालिका असा गवगवा पालिकेतील अधिकारी व सत्ताधारी नेहमी करत होते. परंतु प्रत्यक्षात कामगारांना समान वेतन कधीच मिळालेले नाही. अत्यावश्यक सुविधाही वेळेवर मिळालेल्या नाहीत. कामगारांच्या हक्काचा भविष्यनिर्वाह निधी वेळेवर भरण्यात आला नसल्याचे निदर्शनास आले आहे. काम करत असलेल्या कामगारांचा भविष्यनिर्वाह निधी भरला नाही, परंतु जिवंत नसलेल्या कामगाराचा मृत्यूनंतर तीन वर्षे भविष्यनिर्वाह निधी भरल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत कधी ठेकेदाराच्या कधी अधिकाऱ्यांच्या तर कधी सत्ताधाऱ्यांच्या भीतीमुळे कामगार गप्प बसत होते. परंतु आता कामगारांनी स्वत:च संघटित होऊन हक्कासाठी लढा देण्यास सुरुवात केली आहे. कामगारच कामगारांची युनियन चालवू लागले आहेत. ठेकेदार भविष्यनिर्वाह निधीचा तपशील देत नसल्यामुळे संबंधित कार्यालयातून माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागविली, तेव्हा अनेकांना धक्का बसला आहे. काहींचा निधी कमी भरला आहे. काहींची रक्कम २ ते ३ वर्षे भरलेलीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार पाहून कामगारांना स्वत:चे भविष्य अंधकारमय वाटू लागले आहे. कामगारांनी संघटनेच्या माध्यमातून याविषयी जाब विचारण्यास सुरुवात केली. परंतु याचा राग आलेल्या ठेकेदारांनी कामगारांवर सूडबुद्धीने कारवाई सुरू केली आहे. दिघा विभागात पाणीपुरवठा विभागातील एम. एस. जाधव कंपनीमध्ये काम करणाऱ्या भूपेश मोकाशी व प्रशांत ठाकूर या दोन जणांनी ठेकेदाराकडे भविष्यनिर्वाह निधीची विचारणा केली. यामुळे संतापलेल्या ठेकेदाराने त्यांना चक्क कामावरून काढून टाकले. २ जूनपासून दोन्ही कामगार बेकार झाले असून त्यांच्यावर बेकार होण्याची वेळ आली आहे. स्वत:च्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम विचारणे गुन्हा आहे का, अशी विचारणा हे कामगार करत आहेत. महापालिकेने नेमलेले ठेकेदार हुकूमशाहीपद्धतीने वागू लागले आहेत. कामगारांना गुलामगिरीची वागणूक दिली जात आहे. भविष्यनिर्वाह निधी व इतर घोटाळा बाहेर येऊ नये यासाठी कामगारांवर दबाव टाकण्यास सुरुवात झाली आहे. मानवी अधिकाराचेही उल्लंघन सुरू असून याविरोधात आंदोलन करण्याची व वेळ पडली तर मानवी हक्क आयोग व कामगार विभागाकडेही तक्रार करण्याची तयारी कामगारांनी केली आहे.