शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भूखंडाच्या विकासासाठी विमानतळबाधींंना सहा वर्षांचा वेळ!

By कमलाकर कांबळे | Updated: October 19, 2023 20:32 IST

सिडकोचा महत्त्वपूर्ण निर्णय

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधितांना पुनर्वसन आणि पुनर्स्थापना योजनेंतर्गत वाटप केलेला भूखंडाचा करारनामा झाल्यापासून पुढील सहा वर्षांत विकास करता येणार आहे. सिडकोच्या प्रचलित धोरणानुसार पूर्वी भूखंड विकसित करण्याचा कालावधीत चार ते सहा वर्षांचा होता. मात्र, विशेष बाब म्हणून सिडकोने हा कालावधी सहा वर्षे केला आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना सिडकोने राज्य शासनाच्या मान्यतेने सर्वोच्च पुनर्वसन पॅकेज दिले आहे. या प्रकल्पासाठी स्थलांतरीत करण्यात आलेल्या गावांचे पुनर्वसन आणि पुनर्स्थापना योजनेंतर्गत भूखंड देऊन पुनर्वसन करण्यात आले आहे. सिडकोच्या प्रचलित नियमानुसार भूखंडाचा करारनामा झाल्यापासून चार ते सहा महिन्यांत बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक आहे. हा कालावधी वाढवून मिळावा, अशी अनेक प्रकल्पबाधितांची मागणी होती. त्या अनुषंगाने सिडकोने विशेष बाब म्हणून पुनर्वसन आणि पुनर्स्थापना योजनेंतर्गत वाटप केलेल्या भूखंडाचा करारनामा झाल्यापासून पुढील सहा वर्षांत विकास करण्याची अनुमती संबंधित प्रकल्पबाधितांना दिली आहे.

बांधकाम पूर्ण करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी पुरेसा असून, भूखंडधारकांनी या मुदतीच्या आत आवश्यक परवानग्या घेऊन बांधकाम पूर्ण करावे, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे. दरम्यान, दिलेल्या कालावधीत बांधकाम पूर्ण न झाल्यास संबधितांना नियमानुसार वाढीव मुदत घ्यावी लागेल. त्यासाठी नियमानुसार विलंब शुल्क भरावे लागेल, असे सिडकोने स्पष्ट केले आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यात येथील प्रकल्पग्रस्तांचे मोठे योगदान आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यांना वाटप करण्यात आलेल्या भूखंडांचा विकास करण्यासाठी सहा वर्षांचा कालावधी मंजूर करण्यात आला आहे. या कालावधीत विमानतळबाधितांना सुलभपणे भूखंडाचा विकास करता येईल. - अनिल डिग्गीकर, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

टॅग्स :cidcoसिडको