शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेकरिता सहा निवडणूकनिर्णय अधिकारी

By admin | Updated: April 26, 2017 00:34 IST

पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने सहा निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

कळंबोली : पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने सहा निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या एक-दोन दिवसांत संबंधित अधिकारी या ठिकाणी येतील असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. उपजिल्हाधिकारी दर्जाचे हे अधिकारी असणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मदतीला तहसीलदार दर्जाचे साहाय्यक निवडणूक अधिकारी असणार आहेत.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकूण वीस प्रभागांचा समावेश आहे. त्यामधून ७८ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. पनवेल शहरासह सिडको वसाहतीत आणि समाविष्ट करण्यात आलेली गावे महापालिका हद्दीत आहे. विस्तृतीत क्षेत्रफळ असलेल्या पनवेल महानगरपालिका हद्दीत ५,०९,९०१ इतकी लोकसंख्या तर ४,२५,४५३ मतदार आहेत. एकूण ५७० मतदान केंद्रांवर २४ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्याची जुळवाजुळवी महापालिका प्रशासनाने सुध्दा सुरू केलेली आहे. सुरुवातीला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या निवडणुकीत फक्त एकच निवडणूक निर्णय अधिकारी नसणार आहेत, तर त्याकरिता एकूण सहा जणांची नेमणूक करण्यात येणार आहे. प्रत्येक तीन ते चार प्रभाग मिळून एक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहे. त्यांच्यावर त्या प्रभागाची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. त्यांच्या मदतीला एक साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहे. पनवेल, नवीन पनवेलमधील पाच प्रभागांसाठी दोन, तर १, २, ३ या प्रभागासाठी नावडे येथे, खारघरमध्ये ४५, ६ कामोठे वसाहतीत ११,१२,१३ क्र मांकांच्या प्रभागासाठी निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहे. कळंबोलीत ७, ८, ९, १० या चार प्रभागासाठी निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. तेथून मतदानापूर्वी काम सुरू करण्यात येणार आहे. (वार्ताहर)