शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

केमिकल विक्रीप्रकरणी सहा जणांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई : २४ लाखांचे साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 03:21 IST

रबाळे औद्योगिक वसाहतीमध्ये अवैधपणे केमिकल विक्री करणा-या टोळीतील सहा जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून २४ लाख रूपये किमतीचे साहित्य हस्तगत केले आहे.

नवी मुंबई : रबाळे औद्योगिक वसाहतीमध्ये अवैधपणे केमिकल विक्री करणा-या टोळीतील सहा जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून २४ लाख रूपये किमतीचे साहित्य हस्तगत केले आहे.अटक केलेल्या आरोपींमध्ये अवधेश कृपाशंकर यादव, राजीव देवेंद्र राजभर, आकाश विजय गुप्ता, धनंजय ऊर्फ छोटू सहदेव मेहता, समीर ऊर्फ संदीप रामाशंकर सिंग व महेश नंदलाल कुमार या सहा जणांचा समावेश आहे. रबाळे पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये एकवीरा हॉटेलजवळ अवधेश यादव व त्याचे सहकारी टँकरमधून केमिकलची चोरी करून त्याची विक्री करणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाºयांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार पिंजण, सहायक पोलीस निरीक्षक प्रतापराव कदम, पोलीस उपनिरीक्षक सुनील सावंत व त्यांच्या पथकाने ४ सप्टेंबरला धाड टाकली. पहाटे पावणे तीन ते साडेतीन दरम्यान ही कारवाई करण्यात आली. रोडच्या बाजूला असलेल्या टँकर क्रमांक एमएच ०४ एफ जे ७८४० मधून चार व्यक्ती पाइप टाकून केमिकल काढत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेतले. केमिकलने भरलेले चार व रिकामे चार ड्रम ताब्यात घेतले.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता अवधेश कुमार यादव हा चोरीचे केमिकल विकण्याचा व्यवसाय करत असल्याचे समजले. उर्वरित पाच जण टँकरमधून केमिकल काढून ते संबंधितांना पुरवत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वांकडून तब्बल २४ लाख रूपयांचे केमिकल व इतर साहित्य जप्त केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून या गुन्ह्यामध्ये अजून कोणाचा समावेश आहे का याची चौकशी करण्यातयेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.