शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड

By admin | Updated: April 17, 2017 04:22 IST

बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड चालू करणाऱ्या इतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यात संगणकावर बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्याचाही समावेश आहे

नवी मुंबई : बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड चालू करणाऱ्या इतर दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यात संगणकावर बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्याचाही समावेश आहे. प्रतिपेपर अवघ्या पाच रुपयांसाठी त्याने टाटा डोकोमोच्या डिस्ट्रिब्युटरला बनावट कागदपत्रे तयार करून दिल्याचे समोर आले आहे.कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे मोबाइल सिमकार्ड चालू करणाऱ्या टोळीचा भांडाफोड गुन्हे शाखा कक्ष-२च्या पथकाने केला आहे. या प्रकरणी विजय यादव व सतीश गायकवाड (३२) या दोघांच्या अटकेनंतर त्यांच्या इतर दोघा साथीदारांनाही नुकतीच अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक केलेल्या दोघांमध्ये बनावट कागदपत्रे बनवणाऱ्याचाही समावेश असून शरीफ खान (२९) असे त्याचे नाव आहे. तो उलवेचा राहणारा असून, त्याने प्रत्येक प्रतिपेपर पाच रुपयांसाठी या कटात सहभाग घेतल्याचे तपासात समोर आले आहे. याकामी रामविनय यादव (२४) याने त्याला मदत केल्याने त्यालाही चेंबूरमधून अटक करण्यात आली आहे. सध्या मोबाइल नेटवर्क कंपन्यांमध्ये ग्राहक मिळवण्यासाठी सुरू असलेल्या स्पर्धेतून हा प्रकार घडला आहे. सिमकार्ड डिस्ट्रिब्युटर्स व सेल्स मॅनेजर यांना कंपन्यांकडून टार्गेट दिली जात असून ते पूर्ण करणाऱ्यास आर्थिक मोबदला दिला जातो. त्यानुसार टाटा डोकोमो कंपनीचे प्रतिमहिना २१०० सिमकार्ड विक्रीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी विजय व सतीश यांनी हा प्रकार केला. त्याकरिता शरीफ हा त्यांना बनावट कागदपत्रे बनवून द्यायचा. तर त्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे सुरू केलेली १२२० सिमकार्ड पोलिसांनी जप्त केली आहेत. शरीफचा झेरॉक्सचा व्यवसाय असल्याने ग्राहकाच्या आधारकार्डची एक झेरॉक्स प्रत स्वत:कडे ठेवून घ्यायचा. संगणकावर त्यात फेरफार करून नाव व पत्त्यात बदल करून बनवलेल्या बनावट आधार कार्डची प्रत रामविजयच्या माध्यमातून सतीशपर्यंत पोहोचवायचा. याकरिता सतीश गायकवाड हा प्रतिपेपर सात रुपये द्यायचा. त्यापैकी दोन रुपये स्वत:ला ठेवून रामविजय हा उर्वरित पाच रुपये शरीफला द्यायचा. त्यानंतर विजय व सतीश हे दोघे बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्डची विक्री झाल्याचे भासवून स्वत:कडील मोबाइलमधून ते सुरू करायचे; परंतु टाटा डोकोमो कंपनीच्या अधिकाऱ्यांना बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड घेतल्याचे निदर्शनास आल्याने तक्रार केली.