शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

एस.आय.ई.एसची सव्वा कोटींची देणगी लाटली, नेरुळच्या संस्थेतील प्रकार

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 11, 2024 18:13 IST

इस्टेट मॅनेजरवर गुन्हा दाखल

नवी मुंबई : एस.आय.ई.एस. संस्थेच्या सव्वा कोटी देणगीचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेच्याच इस्टेट मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेला रोख स्वरूपात येणाऱ्या देणग्या संस्थेच्या खात्यात जमा न करता कामगारांच्या खात्यात जमा करून तिचा अपहार केल्याचा आरोप संस्थेने केला आहे. मागील पाच वर्षात हा प्रकार झाला असून संस्थेकडून बँक खात्यांच्या तपासणीत तो उघड झाला आहे. 

साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या नेरुळ येथील दोन संस्थांमध्ये हा प्रकार घडला आहे. या संस्थेच्या आर्धिक देखभालीची जबाबदारी असणाऱ्या संस्थेच्याच पदाधिकाऱ्याने १ कोटी २२ लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार संस्थेने नेरुळ पोलिसांकडे केली आहे. संस्थेला येणारे डोनेशन, देणगी स्वीकारून ती संस्थेच्या बँक खात्यात जमा करण्याची जबाबदारी योगेश परमानंद यांच्यावर होती. मात्र मागील पाच वर्षात त्यांनी सव्वा कोटींची देणगी स्वरूपातील रोकड संस्थेत जमा न करता तिचा अपहार केल्याचा संस्थेचा आरोप आहे. हि रोकड त्यांनी संस्थेच्याच वाहनचालक चालक, लिपिक, शिपाई यांच्या बँक खात्यात जमा केली.

तर सदर कर्मचाऱ्यांकडून त्यांची सही असलेले कोरे धनादेश स्वतःकडे घेतले होते. संस्थेच्या वेगवेगळ्या कामासाठी लागणारा निधी भागवण्यासाठी हे धनादेश घेतले असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र गतवर्षी संस्थचे खजिनदार देवदास नायर यांना संशय आल्याने त्यांनी नेरूळमधील संस्थेची व कामगारांची बँक खाती तपासली. त्यामध्ये काही कामगारांनी योगेश यांच्या सांगण्यावरून संस्थेच्या देणगीची रोकड त्यांच्या खात्यात जमा केली असल्याचे सांगितले. त्यानुसार संस्थेने हा अपहार उघड करून लाटलेले सव्वा कोटी परत करण्याची समज योगेश यांना दिली होती. परंतु त्यांनी ती परत न केल्याने संस्थेने त्यांच्या विरोधात नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई