खोपोली : रायगड जिल्हय़ात 3 शाखा असलेल्या o्री सिद्धिविनायक नागरी सहकारी बँकेत 3 वर्षापूर्वी उघडकीस आलेल्या घोटाळय़ानंतर रिझव्र्ह बँकेने सिद्धिविनायक बँक बुडीत काढली. तब्बल 14 महिने उलटूनही ठेवीदारांना एक छदामही मिळालेला नाही. त्यामुळे ठेवीदारांमध्ये तीव्र नाराजी असून पूर्ण पैसे परत मिळावेत यासाठी मुख्यमंत्री, सहकारमंत्र्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी ठेवीदारांकडून होत आहे.
रसायनी, खोपोली व पनवेल या 3 ठिकाणी शाखा असलेल्या सिद्धिविनायक नागरी सहकारी बँकेचे 26 हजारांहून अधिक ठेवीदार व खातेदार आहेत. सप्टेंबर 2क्11 मध्ये रिझव्र्ह बँकेने या बँकेवर र्निबध आणले. त्यानंतर लेखापरीक्षणामध्ये बँकेचे काही पदाधिकारी व कर्मचा:यांनी 1क् कोटींचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार जानेवारी 2क्13 मध्ये बँकेचे पदाधिकारी, संचालक व मुख्य आरोपी तेरसे यांच्याविरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र रिझव्र्ह बँकेने सिद्धिविनायक बँकेचा परवाना रद्द केला आणि त्यानंतर सहकार खात्याने बँक बुडीत काढली. सहकार खात्याने, रिझव्र्ह बँकेशी संपर्क साधून विलीनीकरण करण्यासंबंधीत निर्णय घेण्याची मागणी ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष व भाजपा अध्यक्ष विजय तेंडुलकर यांनी केली आहे. (खोपोली)
विलीनीकरणाची चर्चा
सिद्धिविनायक बँकेचे एखाद्या सक्षम बँकेत विलीनीकरण करण्यासाठी प्रय} सुरू झाले. त्यानंतर गुजरातच्या राजकोट नागरी सहकारी बँकेने अनुकूलता दाखविली व त्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी रिझव्र्ह बँक आणि केंद्रीय अर्थखात्याकडे पाठविला आहे. परंतु त्यालाही 8 महिने होवून गेले, काहीच हालचाल झालेली नाही.