शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये ठिकठिकाणी श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2023 15:46 IST

उरण परिसरातील ठिकठिकाणच्या मंदिरात श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  

उरण :उरण परिसरातील ठिकठिकाणच्या मंदिरात श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  उरण परिसरात नवीन शेवा,फुंडे, देऊळवाडी, हनुमान कोळीवाडा, मोरा कोळीवाडा, चिरनेर आदी राम मंदिरात श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती.चिरनेरमध्ये १२५ वर्षांची परंपरा जपणाऱ्या मधीलपाडा - तेलीपाडा ग्रामस्थांच्या वतीने यावर्षीही प्रभु श्री रामचंद्राचा अभिषेक सोहळा विधीपूर्वक पूजा अर्चेने पार पडला.मंदिरात अभिषेक, हरिपाठ,भजन कीर्तन प्रवचन,पालखी सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते.

किर्तनकार हभप  प्रकाश महाजन यांचे श्री रामचंद्रांच्या जन्मावर सुश्राव्य किर्तनही पार पडला.मोरा कोळीवाडा,फुंडे, नवीन शेवा येथील राममंदिरही भक्तांनी गर्दी केली होती.या राममंदिरातही भजन-किर्तनाचा भक्तांनी आनंद लुटला.उरण शहरातील राममंदिरही भक्तांनी गजबजले होते.बारा वाजता श्री रामचंद्रांना पाळण्यात टाकून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणच्या मंदिरात भाविकांनी  मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :uran-acउरणRam Navamiराम नवमी