शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील खांदा वसाहत समस्येच्या गर्तेत

By admin | Updated: August 1, 2015 23:33 IST

पन्नास हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या पनवेलमधील खांदा वसाहतीला सध्या विविध समस्या भेडसावत आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येसह खड्डे, कचरा प्रश्न, वाहतूक

- वैभव गायकर,  पनवेलपन्नास हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या पनवेलमधील खांदा वसाहतीला सध्या विविध समस्या भेडसावत आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्येसह खड्डे, कचरा प्रश्न, वाहतूक, पार्किं गच्या समस्येमुळे परिसरातील रहिवाशी हैराण झाले आहेत. सिडको प्रशासन देखील याबाबत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाशी करीत आहेत. शहराचा महत्त्वाचा भाग असलेल्या सेक्टर ७ मधील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागते. खांदा वसाहतीत नाक्यानाक्यावर वाढदिवस, सण उत्सवानिमित्त लावण्यात आलेले बॅनर्स महिनोन्महिने उतरवले जात नसल्याने खांदा वसाहतीला विद्रुप रूप आले आहे. सेक्टर ८, ९ मध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. उघड्यावर कचरा टाकू नये, यासाठी सिडकोने सूचना फलक लावले असले तरी नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत आहेत. वसाहतीत अनेक ठिकाणी पदपथावर फेरीवाल्यांनी अतिक्र मण केले आहे. शिवाजी चौक याठिकाणी मटन विक्रेते, मच्छीविके्र ते, भाजीपाला विक्रेत्यांनी पदपथ गिळंकृत केले आहेत. यामुळे नागरिकांना पदपथावर चालण्यास अडथळा निर्माण होत आहे. अनेक तक्र ारी करून देखील सिडको प्रशासन याची दखल घेत नसल्याची प्रतिक्रिया येथील रहिवासी मनोज पाटील यांनी दिली. शहरात काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचे दिसून येत आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे देखील याठिकाणी लहान-मोठे अपघात घडत आहेत. शहरात अनेक ठिकाणी गटारे तुंबलेली असून पावसाला सुरु वात होताच गटारामधील पाणी रस्त्यावर येत आहे, त्यामुळे याठिकाणाची नालेसफाई देखील अर्धवट झाली असल्याचे दिसून येत आहे.खांदा कॉलनीमधील स्थानिक नगरसेविका सीता पाटील यांनी शहरातील समस्यांबाबत अनेक वेळा पाठपुरावा करून देखील सिडको प्रशासन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरातील गटारामधील गायब झालेली झाकणे बसविण्यासंदर्भात सिडको प्रशासनाला अनेक वेळा पत्र लिहून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याची प्रतिक्रि या त्यांनी दिली. सिडको अधीक्षक अभियंता प्रदीप तांबडे यांच्याशी प्रतिक्रि या जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.