शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत आरोग्य खात्यातील भरतीला लोकांचा अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 01:32 IST

सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण : मनुष्यबळ वाढविण्याची मागणी

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून, शहरातील आरोग्य यंत्रणेसह कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येऊ लागला आहे. महापालिकेच्या माध्यमातून कोविड काळासाठी करण्यात आलेल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आरोग्य भरतीला अल्प प्रतिसाद मिळाला असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा बोजा सहन करावा लागत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर महापालिकेच्या माध्यमातून कोविड सेंटर बंद करण्यात आले होते. परंतु पुन्हा मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत असल्याने बंद केलेले कोविड सेंटर आवश्यकतेनुसार सुरू केले जात आहेत. गेल्यावर्षी कोविड काळात नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपाची भरती करण्यात आली होती. त्यावेळी या भरतीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यावर तात्पुरत्या स्वरूपात भरती केलेले मनुष्यबळ कमी करण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले असून, महापालिकेच्या माध्यमातून गेल्या महिन्यात डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एएनएम, बेडसाइड सहायक आदी पदांच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु या जाहिरातीला अल्पप्रतिसाद मिळाले आहे. त्यामुळे महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर काम करावे लागत आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे महापालिका रुग्णालये तसेच नागरी आरोग्य केंद्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण वाढला आहे. महापालिकेने कोविड काळासाठी तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी पालिकेकेडे केली जात आहे.फेब्रुवारीपासून वाढनवी मुंबईच फेब्रुवारीपासून बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. शनिवारी ३ एप्रिल रोजी शहरात तब्बल १२०५ नवीन बाधित रुग्ण आढळून आले असून, यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.