शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

गाळमुक्त धरण योजनेला पनवेलमधून अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 7:16 AM

शासनाच्या गाळमुक्त धरण या योजनेला पनवेल परिसरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येत आहे. या योजनेसाठी केवळ २७ शेतकऱ्यांचे अर्ज आले असल्याने या योजनेबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

- मयूर तांबडेपनवेल - शासनाच्या गाळमुक्त धरण या योजनेला पनवेल परिसरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येत आहे. या योजनेसाठी केवळ २७ शेतकऱ्यांचे अर्ज आले असल्याने या योजनेबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.धरणांमधून गाळ काढल्याने धरणांची पाणी साठवण क्षमता वाढणार असून त्या भागातील दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास हातभार लागणार आहे. त्याचबरोबर हा धरणातील गाळ शेतकºयांच्या शेतात टाकल्याने त्यांच्या शेतातील जमीन अधिक सुपीक होऊन शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. ही शेतकºयांच्या हिताची बाब असली तरीदेखील पनवेलमधून या योजनेला केवळ २६ अर्जदारांनी प्रतिसाद दिलेला आहे. तालुक्यातील मोहो, सांगुर्ली, चीरवत, तुरमाळे, ओवे, भाताण, कल्हे, हरीग्राम, मोहोपे, टेमघर, वाजे, चेरवली, मालडूंगे, कोप्रोली, दुन्द्रे, गाढे, नेरे येथील २७ शेतकºयांनी धरणातील गाळ काढण्यास सुरुवातही केली आहे.तालुक्यातील पनवेल महापालिकेच्या मालकीचे असलेले देहरंग धरण २00५मध्ये आलेल्या पुरामुळे गाळाने भरले. त्यामुळे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली. या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असून, तो काढण्यासाठी प्रशासनाकडून याअगोदर प्रयत्नही करण्यात आले.गाढेश्वर धरण क्षेत्रात महानगरपालिकेच्या मालकीची २७७ एकर जमीन असून त्यातील १२५ एकर क्षेत्रावर देहरंग धरण वसलेले आहे. निम्म्याहून अधिक जागेत धरणाचे पाणी साचत नाही. वर्षानुवर्षे साचलेला धरणातील गाळ निघत नसल्यामुळे जास्तीचा पाणीसाठा होत नाही. परिणामी, दरवर्षी महापालिकेला एमजेपी, एमआयडीसी आणि सिडकोच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास धरणांची मूळ साठवण क्षमता पूर्ववत होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात वाढदेखील होणार आहे. जलसाठ्यांतदेखील वाढ होणार आहे. या योजनेमध्ये स्थानिक शेतकºयांनी त्यांच्या शेतामध्ये ते स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास तयारी असणे गरजेचे आहे.मोहो येथील हसुराम धर्मा म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, कोंडले येथील मनोज महादेव आंग्रे, सांगुर्ली ग्रामपंचायत यांनी मोरबे, सांगुर्ली, चीरवत, तुरमाले, मोहो येथील तलावातील गाळ काढण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.मालडूंगे येथील लीला उघडा, सखाराम भुर्बडा, कोप्रोली येथील रमेश पाटील, दुन्द्रे येथील संजय पाटील, गाढे येथील महादू वारगडा, वाजे येथील रुपेश भोईर, बबन पाटील, गजानन पाटील, नेरे येथील संदीप ठाकूर, कल्हे येथील बिपीन मुनोथ, हरिग्राम येथील राधीबाई डांगरकर, रतन पाटील, मोहोपे येथील दिलीप पाटील, गोमा भोईर, बाळाराम भोईर, दत्तात्रेय पवार, अंकुश मुंढे, टेमघर येथील वामन म्हात्रे, चेरवली येथील वसंत पाटील यांना महापालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातून गाळ काढण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. भाताण ग्रामपंचायतने भाताण येथील तलावातील गाळ काढण्यासाठी अर्ज केला आहे. ओवे येथील खतीबाजी अब्दुल रशीद खान यांनी ओवे तलावाचा गाळ काढण्यासाठी अर्ज केला आहे. देहरंग धरणातून लाखो ब्रास गाळ निघणे अपेक्षित आहे. तरच धरणात पाण्याचा साठा वाढू शकतो. मात्र आत्तापर्यंत समाधानकारक गाळ काढण्यात आला नसल्याची माहिती तहसील विभागाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे शासनाच्या गाळमुक्त धरण योजनेला पनवेलमधून जास्तीचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या