शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

सराफांच्या देशव्यापी बंदचा कारागिरांना फटका

By admin | Updated: April 5, 2016 01:31 IST

सराफांच्या देशव्यापी बंदमुळे लग्नसोहळ्यांवर परिणाम झाला आहे. सोन्याची दुकाने बंद असल्याने नकली दागिने घालून लग्नसमारंभ पार पाडले जात आहेत.

खोपोली : सराफांच्या देशव्यापी बंदमुळे लग्नसोहळ्यांवर परिणाम झाला आहे. सोन्याची दुकाने बंद असल्याने नकली दागिने घालून लग्नसमारंभ पार पाडले जात आहेत. केंद्र सरकार व सराफांच्या वादाचा फटका सोने, चांदीचे दागिने बनविणाऱ्या व दुकानाबाहेर दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांना बसला आहे. एक महिन्यापेक्षा अधिक काळ सराफांची दुकाने बंद असल्याने या कारागिरांवर आर्थिक संकट कोसळले आहे. आणखी काही दिवस संप सुरू राहिला तर उपासमारीची वेळ कारागीर व त्यांच्या कुटुंबीयांवर येणार आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या उत्पादनावर केंद्र सरकारने लावलेल्या अबकारी कराच्या विरोधात सराफांनी देशव्यापी संप पुकारला आहे. गेले ३५ दिवस यामुळे सोन्याची दुकाने बंद आहेत. याचा फटका सर्वसामान्यांनाही बसला आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असून, लग्न नकली दागिने घालून उरकण्यात येत आहेत. या बंदचा मोठा फटका सोन्याच्या दुकानात काम करणारे कामगार व दुकानाबाहेर दुरुस्तीची कामे करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या कारागिरांनाही बसला आहे. दुकाने बंद असल्याने हातावर पोट असलेले हे कारागीर आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यातील विविध दुकानांबाहेर उदरनिर्वाह करीत असलेल्या कारागिरांची संख्या ५०० पेक्षा जास्त आहे. केंद्र सरकार व सराफ आपल्या मतांवर ठाम असल्याने आणखी काही दिवस ही कोंडी सुटण्याची शक्यता नाही. त्यामुळे या कारागिरांना आपल्या कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी अन्य पर्याय शोधावे लागणार आहेत. अशा प्रकारे काम करणारे कारागीर मोठ्या प्रमाणात अन्य राज्यांतून आलेले आहेत. स्थानिक कारागिरांची संख्या २५ टक्क्यांच्या आसपास आहे. पूर्णवेळ दागिन्यांची दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांना दिवसाकाठी ५०० रुपये मिळत होते. त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. मात्र गेले काही दिवस दुकाने बंद असल्याने हे कारागीर हवालदिल झाले आहेत.