शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

रस्ता रुंदीकरणातील बाधितांना दुकाने व घरे

By admin | Updated: December 12, 2015 02:34 IST

रस्ता रुंदीकरणातील बाधितांना पर्यायी दुकाने व घरे देण्याचा ठराव पालिका महासभेत बहुमताने मंजूर झाला आहे. पालिकेच्या इंदिरा गांधी भाजी मार्केट येथे दुकाने बांधण्यात येणार असून,

सदानंद नाईक, उल्हासनगररस्ता रुंदीकरणातील बाधितांना पर्यायी दुकाने व घरे देण्याचा ठराव पालिका महासभेत बहुमताने मंजूर झाला आहे. पालिकेच्या इंदिरा गांधी भाजी मार्केट येथे दुकाने बांधण्यात येणार असून, इमारतीमधील प्लॉटधारकांना आरक्षित भूखंडावर वसविण्यात येणार आहे. उल्हासनगर पालिकेने कल्याण-अंबरनाथ महामार्गाचे रुंदीकरण हाती घेतले असून, १०१० जण बाधित होणार आहेत. त्यापैकी २६८ दुकाने व १६८ घरे १०० टक्के बाधित होत असल्याने त्यांना पर्यायी दुकाने व घरे देण्याचा ठराव शिवसेना, भाजपा, रिपाइं, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाने आणला. साई पक्षाचे जीवन इदनानी यांनी दुसरा ठराव आणून व्यापाऱ्यांना लवकरात लवकर पर्यायी दुकाने मिळण्याची मागणी केली. व्यापाऱ्यांनी कोट्यवधी किमतीचे दुकाने स्वत:च्या हाताने तोडली आहे. त्यांनी दाखविलेल्या मोठ्या मनाचा मान राखून व त्यांचे उघड्यावर पडलेले संसार सावरण्यासाठी त्यांना पर्यायी जागा देणे गरजेचे असल्याचे मत सेनेचे धनंजय बोडारे यांनी व्यक्त केले. साई पक्षाचे जीवन इदनानी, रिपाइंचे भगवान भालेराव, सेनेचे राजेंद्रसिंग भुल्लर, माजी महापौर राजश्री चौधरी, बी. बी. मारे, सुरेश जाधव, सुभाष मनसुलकर, भाजपाचे जमनुदास पुरस्वानी, महेश सुखरामणी, डॉ. नीना नाथानी, राष्ट्रवादीचे ओमी कालानी, मनोज लासी यांनी चर्चेत भाग घेऊन पर्याय सूचविले आहेत.>> कल्याण-अंबरनाथ महामार्गाच्या रुंदीकरणातील बाधित तसेच यापूर्वी ३३ रस्त्यांच्या व भविष्यात रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्यांना पर्यायी दुकाने व घरे मिळावी, आरक्षित भूखंड व इंदिरा गांधी भाजी मार्केटच्या जागी २०० स्केअरफुटाचे २०० गाळे बांधून ९९ वर्षांच्या करारनाम्यावर देणे, दरमहा ३०० रुपये नाममात्र भाडे व जुनेच मालमत्ता कर असा सर्वपक्षीय ठराव रिपाइंचे नगरसेवक भगवान भालेराव यांनी वाचून दाखविला. त्यावर मतदान होऊन बहुमताने ठराव मंजूर झाला.बाधितांसाठी स्वतंत्र कक्ष : रस्ता रुंदीकरणातील बाधितांची ग्राऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी उपायुक्त नितीन कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र कक्ष उघडण्यात येणार आहे. बाधित व्यापारी व इमारतीमधील प्लॉटधारकाच्या समस्या कक्षामार्फत सोडविण्यात येणार असून आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांचे त्यावर नियंत्रण असेल.रस्त्याचे काम जलद : महापालिका महासभेने मंजूर केलेला ठराव शासनाला पाठविण्यात येणार आहे. बाधितांना न्याय देऊन रस्त्याचे काम सुरू करण्याचे आयुक्त मनोहर हिरे यांनी महासभेत सांगितले. महिन्यापूर्वी रस्त्याच्या अंतर्गत भुयारी गटारीचे काम सुरू करून फुटपाथ बांधण्यात येईल. विद्युत महामंडळाला पत्र देऊन विद्युत खांब व वाहिन्या बदलविण्यात येईल आहेत.