शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

हायब्रीड बसेस खरेदीचा घोळ

By admin | Updated: April 25, 2016 03:12 IST

पर्यावरण रक्षणासाठी महापालिका जेएनएनयूआरएमअंतर्गत दहा बसेसची खरेदी करणार होती. परंतु प्रशासकीय राजकीय उदासीनतेमुळे हा प्रस्ताव रखडल्याने अखेर दोनच बस विकत घेण्याचे निश्चित केले.

नवी मुंबई : पर्यावरण रक्षणासाठी महापालिका जेएनएनयूआरएमअंतर्गत दहा बसेसची खरेदी करणार होती. परंतु प्रशासकीय राजकीय उदासीनतेमुळे हा प्रस्ताव रखडल्याने अखेर दोनच बस विकत घेण्याचे निश्चित केले. त्यासाठी जवळपास दोन कोटी रूपये भरले असून अद्याप बसेस ताब्यात घेतल्या नाहीत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचा कारभार वारंवार वादग्रस्त ठरत आहे. नोकरभरती, बसेस खरेदी, बसचे खासगीकरण असे अनेक निर्णय यापूर्वीही वादग्रस्त ठरले आहेत. आता यामध्ये हायब्रीड बस खरेदीच्या प्रस्तावाचीही भर पडली आहे. पालिकेने जेएनएनयूआरएमअंतर्गत दहा बसेस खरेदी करण्याचा निर्णय २०१४ मध्ये घेतला होता. परंतु ते शक्य न झाल्याने ५ बसेस खरेदीसाठी सुधारित मंजुरी घेण्यात आली. प्रत्येक बससाठी २ कोटी ६८ लाख ७८ हजार रूपये, प्रत्येक वर्षी देखभाल दुरूस्तीसाठी ९८ लाख ८४ हजार रूपये खर्च येणार होता. परंतु हा प्रस्ताव मार्च २०१५ च्या समितीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला. यानंतर व्हाल्वो कंपनीला निविदा स्वीकृतीचे पत्रही दिले होते. परंतु केंद्र शासनाची बस खरेदीसाठीची मुदत डिसेंबर २०१४ पर्यंतच होती. यानंतर शासनाने फेब्रुवारी २०१५ पर्यंत मुदत वाढवून दिली. परंतु याच दरम्यान परिवहन समितीने पाच बसेस खरेदीचा प्रस्तावच रद्द केला. महापालिकेने बसेस खरेदी करण्यासाठी फेरनिविदा मागविल्या व पुन्हा व्हाल्वो कंपनीलाच हे काम दिले. दरम्यान, केंद्र शासनाची मुदत संपल्याने शासनाने जेएनएनयूआरएमअंतर्गत यासाठी मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती. हायब्रीड बसेस ही इंधन व बॅटरीवर चालणार आहे. यामुळे पर्यावरण व इंधनाची बचत होणार आहे. केंद्र शासनाकडून त्याला अनुदान दिले जाणार आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हायब्रीड बस खरेदीची घोषणाही केली. पैसे भरलेले असताना व बसही तयार असताना ती प्रत्यक्षात ताब्यात घेतली जात नसल्याने प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या हेतूवर शिवसेना सदस्यांनी आक्षेप घेतले आहेत.