शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जुईनगरमध्ये दफनभूमीविरोधात शिवसेनेची स्वाक्षरी मोहीम

By admin | Updated: June 22, 2017 00:28 IST

जुईनगर सेक्टर २ मध्ये शाळा व बैठ्या चाळींच्या समोरील भूखंड गोसावी व लिंगायत समाजाला दफनभूमीसाठी आरक्षित करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जुईनगर सेक्टर २ मध्ये शाळा व बैठ्या चाळींच्या समोरील भूखंड गोसावी व लिंगायत समाजाला दफनभूमीसाठी आरक्षित करण्यात आला आहे. नागरी वस्तीमध्ये दफनभूमीला शिवसेनेने विरोध केला असून बुधवारी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. शाळा व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांच्या वसाहतीच्या समोरच हा भूखंड आहे. यामुळे रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. दफनभूमीला जागा मिळालीच पाहिले, परंतु ती नागरी वसाहतीमध्ये नसावी. नागरी वसाहतीमध्ये व शाळेच्या समोरच हा भूखंड असल्याने भविष्यात गंभीर स्थिती होण्याची शक्यता आहे. यामुळे रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. शिवसेना नगरसेवक रंगनाथ औटी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले आहे. बुधवारी आयोजित केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला असून हजारो रहिवासी व पालकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होवून विरोध दर्शविला. सह्यांचे निवेदन महापालिका आयुक्त व सिडको प्रशासनाला देण्यात येणार आहे. लोकभावना लक्षात घेवून या भूखंडाचे वाटप रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येणार आहे. स्वाक्षरी मोहिमेमध्ये औटी यांच्यासोबत नगरसेवक विशाल ससाणे, विभाग प्रमुख गणेश घाग, मनोज चव्हाण, राजेश पुजारी उपस्थित होते. रहिवाशांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यांची दखल प्रशासनाने घेतली नाही तर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.