शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीवरून शिवसेनेत संघर्ष

By admin | Updated: April 23, 2017 03:45 IST

स्थायी समितीवर सदस्य नियुक्तीवरून शिवसेनेमधील मतभेद विकोपाला गेले आहेत. विजय चौगुले व विजय नाहटा यांच्या गटामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असून १५ नगरसेवकांनी

नवी मुंबई : स्थायी समितीवर सदस्य नियुक्तीवरून शिवसेनेमधील मतभेद विकोपाला गेले आहेत. विजय चौगुले व विजय नाहटा यांच्या गटामध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असून १५ नगरसेवकांनी राजीनामे देण्याची तयारी सुरू केली आहे. नवी मुंबई शिवसेनेमधील मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. स्थायी समितीवर पाच सदस्य नियुक्त करण्यासाठी खासदार व पालकमंत्री यांनी एक यादी व उपनेते विजय नाहटा यांनी एक यादी सादर केली. तहकूब सभेमध्ये नावे निश्चित केली जाणार असल्याने पुन्हा यादी बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. विरोधी पक्ष नेते विजय चौगुले व त्यांच्या मर्जीतील नगरसेवकांची नावे असलेली यादी बदलून नवीन सदस्यांना संधी देण्याचे मत काही नगरसेवकांनी व्यक्त केले आहे. यासाठी जवळपास १५ नगरसेवकांनी राजीनामे देण्याची तयारी सुरू केली आहे. बेलापूर विधानसभा संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे यांच्याजवळ नगरसेवकांनी राजीनामे सादर केल्याची चर्चा आहे. चौगुले व त्यांच्या समर्थकांची नावे वगळण्यासाठी हे दबावतंत्र सुरू आहे. दुसरीकडे चौगुले व त्यांच्या समर्थकांनीही पालकमंत्र्यांनी नावे निश्चित केली असताना उपनेते त्यांची मनमानी करत असल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेने दुसऱ्यांदा स्थायी समिती सभापतीपद व महापौरपद मिळविण्याचा निर्धार केला होता. पण सदस्य निवडीमध्येच एकमत होत नसल्याचे दिसून आले आहे. शिवसेना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर असून ही फूट थांबविण्याचे आव्हान पक्षश्रेष्ठींपुढे निर्माण झाले आहे. याविषयी विठ्ठल मोरे यांच्याशी संपर्क साधला पण संपर्क होवू शकला नाही.