शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना स्वीकृत नगरसेवकाचा राजीनामा, फोडाफोडीचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 00:37 IST

शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोण, कोणाचे किती नगरसेवक फोडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीची स्पर्धा सुरू झाली आहे. शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक राजेश शिंदे यांनी पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोण, कोणाचे किती नगरसेवक फोडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपसह महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली आहे. सत्ता मिळविण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. आतापर्यंत भाजपचे चार नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत. अजून काही नगरसेवक भाजपला सोडण्याच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनेही सेनेमधील नाराज पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्यास सुरुवात केली आहे. तुर्भे स्टोअर्समधील शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक राजेश शिंदे यांनी शुक्रवारी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. तुर्भे परिसराच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे राजीनामा दिला असून त्या वेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. भाजपने सीवूड, तुर्भे स्टोअर्स, इंदिरानगर, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली परिसरातील नाराज शिवसेना पदाधिकाऱ्यांना फोडण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचे काही नगरसेवकही भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे.शिवसेना व राष्ट्रवादीनेही भाजपचे नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केली आहे. सीवूड, कोपरखैरणे व तुर्भेमधील काही नगरसेवक शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये येणार असल्याची चर्चा सुरू झाली असून पुढील आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

>शेवटच्या टप्प्यात समीकरणे बदलणारनिवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पक्षांतराचे प्रमाण वाढणार आहे. महाविकास आघाडी झाल्यास शिवसेनेच्या अनेकांना तिकिटापासून वंचित राहावे लागणार आहे. नाराज झालेले शिवसेना पदाधिकारी २०१५ प्रमाणे पुन्हा बंडखोरी करणार असल्याच्या प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकारीच खासगीत देऊ लागले आहेत.>ऐरोली मतदारसंघावर लक्षभारतीय जनता पक्षाने ऐरोली मतदारसंघामधील शिवसेनेचे काही नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केली आहे. घणसोली ते कोपरखैरणे दरम्यान पाच नगरसेवक भाजपमध्ये येतील, असे काही पदाधिकारी खासगीत सांगत आहेत. कोपरखैरणेमध्ये भाजपचे एक किंवा दोन नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करतील, असा दावाही केला जात असून शिवसेनेने दिघा परिसरातील नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केली आहे.