शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांनी पाठलाग करून चोरट्यास पकडले

By admin | Updated: April 30, 2017 03:55 IST

कळंबोलीत लग्नासाठी बँकेतून पैसे काढून घरी जात असलेल्या महिलेच्या हातामधील पैशांची बॅग चोरट्यांनी हिसकावून पळ काढला.

नवी मुंबई : कळंबोलीत लग्नासाठी बँकेतून पैसे काढून घरी जात असलेल्या महिलेच्या हातामधील पैशांची बॅग चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. येथे उभ्या असलेल्या शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार पाहून तत्काळ चोरट्यांचा पाठलाग करून त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. नवी मुंबईमध्ये बँकेतून पैसे घेऊन येणाऱ्या नागरिकांना लुटण्याचे प्रकार वाढू लागले आहे. पैसे भरत असताना ते मोजण्याच्या किंवा त्यांचे नंबर नोंद करण्याचे कारण देऊन ते हिसकावून नेले जात आहेत. बँकेतून पैसे घेऊन बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या हातामधून बॅगही हिसकावली जात आहे. शनिवारी दुपारी कळंबोलीमधील अभ्युदय बँकेतून एक महिलेने लग्नासाठी २० हजार रुपये काढले होते. पैसे घेऊन घरी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातामधील बॅग हिसकावून नेली. महिलेने आरडाओरड केला असता तेथून जाणाऱ्या शिवसेना नेते बबन पाटील. गिरीश धुमाळ, भानुदास कोळी व इतर पदाधिकाऱ्यांनी ऐकले. शिवसैनिकांनी तत्काळ चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. चोरट्याला बेदम मारहाण करून कळंबोली पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. शिवसैनिकांच्या दक्षतेमुळे चोरटा गजाआड गेला असून या कामगिरीसाठी संबंधित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे. नवी मुंबईमध्ये सोनसाखळी चोरी व कारची काच तोडून आतमधील लॅपटॉप पळविण्याच्या घटना वाढत आहेत. याबरोबर बँकेतून पैसे घेऊन जाणाऱ्यांची बॅग हिसकावण्याच्या घटनाही वारंवार घडत आहे. या गुन्ह्यांमध्ये चोरटे धुमस्टाइल मोटारसायकल चालवून बॅग किंवा दागिने हिसकावतात व क्षणाचाही विलंब न लावता पळून जातात. काही क्षणात व वेगामध्ये ही घटना घडत असल्याने चोरट्यांना पकडता येत नाही. चोरटे आलेल्या मोटारसायकलचा नंबरही मिळत नसल्याने त्यांचा शोध घेणे अवघड होत आहे. शिवसैनिकांनी धाडसाने चोरट्यांना पकडल्यामुळे त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला जात आहे. याशिवाय इतर नागरिकांनीही दक्षता दाखवावी व कायदा हातात न घेता आरोपीस पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे आवाहन केले जात आहे.