शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल ग्रामपंचायतीत शेकाप,महाविकास आघाडीची सरशी; 17 पैकी 9 महाविकास आघाडीकडे

By वैभव गायकर | Updated: November 6, 2023 17:32 IST

भाजपला 7 तर एका जागेवर अपक्ष

वैभव गायकर

पनवेल: पनवेल तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी स्पष्ट झाला.विधानसभा,लोकसभेची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत शेकाप महाविकास आघाडीची सरशी दिसून आली.17 पैकी 9 जागेवर शेकाप,महाविकास आघाडीचे थेट सरपंच निवडून आले तर 7 जागेवर भाजप आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार थेट सरपंच निवडून आला आहे.

मागील महिना भरापासून पनवेल मध्ये निवडणुकांचा उत्साह शिगेला गेला होता.पनवेल आणि उरण विधानसभे मधुन भाजपचे आमदार निवडून आले आहेत.त्यामुळे या ग्रामपंचायतीचा निकाल काही प्रमाणात भाजप विरोधीच आहे असे दिसून येत आहे.गावपातळीवर निवडणुकीत राजकीय पक्षांचा जनाधार कमी मानला जात असला तरी पनवेलच्या ग्रामीण भागात भाजपा विरोधी सूर दिसून येत आहे.नैना प्रकल्पासह स्थानिक पातळीवर अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत.

भाजपचा शहरी भागात वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आले.विचुंबे आणि देवद या ग्रामपंचायती मध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे त्याचाच फायदा याठिकाणी झाल्याचे दिसून आले.शहरी मतदारांचा कौल भाजपकडे असल्याचे या दोन ग्रामपंचायतीत पहावयास मिळाले.तर ओवळे ग्रामपंचायतीत देखील भाजप पुरस्कृत थेट सरपंच निवडून आला.नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लागुन असलेल्या दापोली ग्रामपंचायतीवर शेकाप महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकवला आहे.महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार बाळाराम पाटील तर भाजपच्या वतीने प्रशांत ठाकुर यांनी या निवडणुकीची दुरा सांभाळली.

ग्रामपंचायत निवडणुकीत 83 टक्के मतदान झाले होते.17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे विश्लेषण करायचे झाल्यास शेकाप,महाविकास आघाडी ने भाजपाला मात दिली आहे.आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या दृष्टीने या निवडणुका महत्वाच्या मानल्या जात आहेत.

शेकाप महाविकास आघाडी

दुंदरे- सुभाष भोपीकोन - अश्विनी शिसवेकसळखंड -संजय घरतदापोली - निकिता समाधान घोपकरवाघिवली - अनिल पाटीलगुळसुंदे - मिनाक्षी जगतापतुराडे - रंजना गायकवाडवावेघर - गितांजली गाथाडेगिरवले - प्रताप चंद्रकांत हातमोडे

भाजपा

ओवळे - रूपेश गायकवाड विचुंबे - प्रमोद भिंगारकर भिंगार -  गुलाब वाघमारेमालडुंगी - सिताराम चौधरीसोमाटणे - तेजस्वी पाटीलन्हावे - जितेंद्र पाटील 

■ गाव विकास आघाडीचिखले - दिपाली तांडेल

■ शेकाप बिजेपी (युती)देवद - विनोद वाघमारे