शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

सावली ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा तिढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 02:13 IST

सेंट्रल पार्कच्या नावाखाली पालिकेने उद्ध्वस्त केलेल्या घणसोलीतील सावली ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : सेंट्रल पार्कच्या नावाखाली पालिकेने उद्ध्वस्त केलेल्या घणसोलीतील सावली ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. प्रकल्पबाधितांनी सेंट्रल पार्कलगतच्याच भूखंडावर पुनर्वसनाची मागणी केली आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात स्थानिक आमदारांच्या समवेत पालिका आयुक्तांसोबत बैठक निश्चित करण्यात आली असून, त्यात तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.सेंट्रल पार्कसाठी भूखंड आरक्षित असल्याच्या कारणावरून घणसोली येथील सावली गाव उद्ध्वस्त करून दहा वर्षांचा कालावधी होत आला आहे, तर तीन वर्षांपूर्वी त्याठिकाणी सुरू झालेल्या पार्कच्या पहिल्या टप्प्याचे देखील काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तिथल्या मूळ ग्रामस्थांच्या घरांसह लगतच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आलेली. या वेळी सदर गावठाणाच्या जागेच्या हक्कावरून देखील ग्रामस्थांनी सिडको व महापालिकेला आव्हान दिले होते; परंतु ग्रामस्थांचा विरोध डावलून त्यांची घरे पाडण्यात आलेली. त्यामुळे सावली गावातील मूळ ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात देखील लढा सुरू ठेवला आहे; परंतु पुनर्वसनाचा तिढा सुटत नसल्याने लोकप्रतिनिधींनी प्रयत्न सुरू केले आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात महानगरपालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्यासोबत सावली ग्रामस्थांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये पुनर्वसनाचा तिढा सुटेल, असा विश्वास पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पबाधितांकडून व्यक्त होत आहे.सावली गाव हटवल्यानंतर तिथला ४४ हजार १२४.९३ चौ.मी.चा भूखंड सिडकोने सेंट्रल पार्कसाठी हस्तांतर करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र सिडकोने एकूण ५८६४ चौ. मी. क्षेत्रफळाचे तीन भूखंड वगळून उर्वरित ३८ हजार २६०.९३ चौ.मी. भूखंड पालिकेला हस्तांतरण केला. त्यात तीनपैकी एका भूखंडावरच पुनर्वसन व्हावे असे प्रकल्पबाधित सावली ग्रामस्थांचे म्हणणे आहे; परंतु सावली गावठाणातील सुमारे १५ कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी २५ गुंठे भूखंडाची आवश्यकता आहे. तेवढ्या क्षेत्रफळाचा एकत्र भूखंड सेंट्रल पार्कलगत नसल्याने एक पूर्ण भूखंड तर दुसºया अर्धा भूखंड पुनर्वसनासाठी वापरला जावा, अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या या भावना पालिका व सिडकोपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आमदार संदीप नाईक यांनी सांगितले. तसेच पार्कच्या जागेतून वगळलेले इतरही भूखंड पालिकेच्या ताब्यात मिळावे याची देखील मागणी सिडकोकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.