शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रोह्यात पाणीटंचाईची भीषण समस्या

By admin | Updated: April 8, 2016 01:47 IST

महाराष्ट्रभर सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरले आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या रोहा तालुक्यात जाणवू लागली आहे. तालुक्यातील खारगाव ग्रामपंचायत हद्दीतील उसर गावानजीक डोंगराळ

शशिकांत मोरे,  धाटावमहाराष्ट्रभर सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरले आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या रोहा तालुक्यात जाणवू लागली आहे. तालुक्यातील खारगाव ग्रामपंचायत हद्दीतील उसर गावानजीक डोंगराळ अतिदुर्गम भागात असलेल्या ठाकूरवाडीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी अक्षरश: दीड ते दोन कि.मी.पायपीट करावी लागते. याठिकाणी गावालगत तीन विहिरी आहेत, मात्र या तिन्ही विहिरींनी तळ गाठल्यामुळे ग्रामस्थानी टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे.खारगाव ग्रामपंचायत हद्दीत महसुली गावांमध्ये खारगाव, गौळवाडी, तारेघर, खारी, उसर, तळवली तर्फेघोसाळे या सहा गावांचा समावेश आहे. तर केळदवाडी, उसर-फणसवाडी आणि ठाकूरवाडी या तीन वाड्यांचा समावेश आहे. यातील ठाकूरवाडीमध्ये ५७ घरे असून अंदाजे २५० लोकसंख्या आहे. या गावात ३ विहिरी आहेत तर यापैकी एका विहिरीचे बांधकाम ढासळले असून झाडे, झुडपाच्या गर्तेत असलेल्या या विहिरीवर पाणी भरणे मात्र गावकऱ्यांना धोकादायक होऊन बसले आहे. मार्च महिन्यानंतर विहिरीतील पाणी तळ गाठल्याने पाण्याची कमतरता जाणवते. महिलांना पाण्यासाठी गावानजीकच्या डोंगरातून झऱ्याचे पाणी आणण्याकरिता किमान ४ कि.मी. चा प्रवास करावा लागतो. तर पाळीव प्राण्यांमध्ये गुरांना, शेळी मेंढ्यांनाही पाणी नसल्याने गावापासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या कुंडलिका नदीच्या खाडीतून आपली तहान भागवावी लागत आहे. कित्येक दिवस पाण्याकडे नजरा लावून बसलेल्या येथील ग्रामस्थांना बुधवारी (६ एप्रिल) पहिला टँकर गावासाठी आला.>ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे त्या गावांकडून पाण्यासाठी आलेले प्रस्ताव विचारात घेऊन जिल्हाधिकारी शीतल उगले यांची मंजुरी घेऊनच त्या गावांना त्वरित पाणीपुरवठा करण्यात येईल.- ऊर्मिला पाटील, तहसीलदार, रोहा