शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोली वसाहतीत उभारले सात ई-टॉयलेट, एक महिन्यात वापरास खुले होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 02:23 IST

महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानानंतर सिडको प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. कळंबोली वसाहतीत ई- टॉयलेट उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : महापालिकेच्या स्वच्छ भारत अभियानानंतर सिडको प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. कळंबोली वसाहतीत ई- टॉयलेट उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पन्नास लाखांपेक्षा जास्त खर्च करून एकूण सात टॉयलेट उभारून एका महिन्याच्या आत ते वापरण्यास खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे रहिवासी, पादचाºयांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.कळंबोलीत सार्वजनिक स्वच्छतागृह आणि शौचालयाची बोंबाबोंब आहे. वारंवार पाठपुरावा करूनही स्वच्छतागृह आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. परंतु राज्य व केंद्र शासनाने हाती घेतलेले स्वच्छता अभियान पनवेल महानगरपालिकेने बºयापैकी यशस्वी केले आहे. त्याचबरोबर आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांनी पुढाकार घेवून महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त केले आहे. त्यानुसार सिडकोने या कामासाठी आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अधीक्षक अभियंता एस.जी. रोकडे यांनी कळंबोलीत ई-टॉयलेट उभारण्याकरिता पुढाकार घेतला. वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांनी पाठपुरावा करून प्रस्ताव मंजूर करून घेतला.नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर हा उपक्र म हाती घेण्यात आलेला आहे. या वसाहतीत पादचारी, फेरीवाले, रिक्षावाले त्याचबरोबर दिवसभर रस्त्यावर काम करणाºयांची संख्या कमी नाही. त्यांना शौचालयाची व्यवस्था नसल्याने मोठी कुचंबणा होत होती. ई-टॉयलेट सुरू झाल्यानंतर ही गैरसोय दूर होणार आहे.स्वयंचलित शौचालयपर्यावरणाच्या दृष्टिकोनात उपकारक असलेले हे टॉयलेट स्वयंचलित आहेत. त्यामध्ये दोन रुपयांचे कॉईन टाकले की ते ओपन होईल. स्टीलद्वारे संपूर्ण शौचालये तयार करण्यात आले आहे. पाण्याचा अपव्यय टळणार आहेच त्याचबरोबर स्वच्छता राहील. संगणकाद्वारे त्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. एम.एन. काळभोर ही कंपनी ई- टॉयलेटचे काम करीत आहे.नागरिक, प्रवाशांची गैरसोय लक्षात घेवून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ई-टॉयलेट ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तरी इतर ठिकाणी ही सुविधा सुरू करण्याचा आमचा मानस आहे. यामुळे स्वच्छता तर राहीलच त्याचबरोबर पाण्याची नासाडी होणार नाही.- बी.व्ही. गायकवाड,साहाय्यक कार्यकारी अभियंता, सिडको,कळंबोली

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई