शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त ठेकेदारांचे साखळी उपोषण सुरूच,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 07:13 IST

सिडको प्रशासन व ठेकेदार स्थानिक विमानतळ प्रकल्पग्रस्त ठेकेदारांवर अन्याय करीत आहेत. ठरल्याप्रमाणे योग्य मोबदला दिला जात नसल्याने दहा गावांतील विमानतळ बाधित ठेकेदारांनी प्रशासन व प्रमुख ठेकेदाराविरोधात

पनवेल : सिडको प्रशासन व ठेकेदार स्थानिक विमानतळ प्रकल्पग्रस्त ठेकेदारांवर अन्याय करीत आहेत. ठरल्याप्रमाणे योग्य मोबदला दिला जात नसल्याने दहा गावांतील विमानतळ बाधित ठेकेदारांनी प्रशासन व प्रमुख ठेकेदाराविरोधात शुक्रवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनावर कोणताही तोडगा न निघाल्याने प्रकल्पग्रस्त लॉरीमालक कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून पुकारलेले हे उपोषण तिसºया दिवशीही सुरूच होते. दरम्यान, मागण्या लवकर मान्य न केल्यास विमानतळ क्षेत्रातील सर्व कामे बंद करण्याचा इशारा या उपोषणकर्त्यांनी दिला आहे.उपोषणाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत व कामगारनेते महेंद्र घरत यांनीही आपला पाठिंबा या उपोषणकर्त्यांना दर्शविला आहे. दुसºया दिवशी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील, शिवसेना आमदार मनोहर भोईर तसेच काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. भाजपानेत्यांनी या उपोषणकर्त्यांकडे पाठ फिरवल्याने या उपोषणकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. तीन दिवस उलटूनही सिडको प्रशासन अथवा मोठ्या ठेकेदारांनी यासंदर्भात उपोषणकर्त्यांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नसल्याने, जसजसे उपोषणाचे दिवस पुढे जातील, तसतसे उपोषणाचे स्वरूप बदलणार आहे. असा इशारा कवी तारेकर या उपोषणकर्त्या ठेकेदाराने दिला आहे.विमानतळ क्षेत्रात कार्यरत असलेले ३०० डंपर, जेसीबी दुसºया दिवशीही बंद ठेवण्याने विमानतळाचे भरावाचे काम मंदावले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्यांचा विचार केला जाणार नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.दरम्यान, आमच्या उपोषणाची दखल घेतली गेली नाही, तर दि. २९ रोजी दहा गावांतील सर्व स्थानिक विमानतळग्रस्त ठेकेदारांच्या कुटुंबासह रस्त्यावर उतरून सिडकोची सर्व कामे बंद पाडू. या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सिडको व संबंधित ठेकेदार जबाबदार असतील, असेही या वेळी कवी तारेकर यांनी स्पष्ट केले.उपोषणकर्त्यांच्या मागण्यासिडको प्रशासनाने १६ सप्टेंबर २0१७ रोजी बैठक घेऊन डंपर, पोकलेन यांचे प्रतिफेरीचे दर निश्चित करून दिले होते. त्यानुसार पोकलेन प्रतितास १६५0 (बकेट ), पोकलेन १९५0 ( ब्रेकर ), तर डंपर प्रतिफेरी ६५0 रु पये २ कि.मी.पर्यंत असा दर ठरला होता. १५ नोंव्हेंबरपर्यंत या दराप्रमाणे पेमेंट करण्यात आले. त्यानंतर नवीन दर ठरविण्यासाठी ठेकेदार मुख्य कंत्राटदारांकडे गेले असता नाममात्र दरात काम करण्याचे त्यांना सांगण्यात आले. त्याला विरोध करीत ठेकेदारांनी काम बंद करून शुक्रवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई